नंदूरबार l प्रतिनिधी
23 व्या नंदुरबार जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांचे नंदुरबार जिल्ह्याचे प्रमुख व सत्र न्यायाधीश राजेश तिवारी यांचे उपस्थितीत समारोप संपन्न झाला.क्रीडा स्पर्धेत नंदुरबार विभाग संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले आहे. सर्वोत्कृष्ट पुरुष अथलेटिक्सचा पुरस्कार पोलीस शिपाई हेमंत बारी, सर्वोत्कृष्ट महिला अॅथलेटिक्सचा पुरस्कार महिला पोलीस शिपाई निंबाबाई वाघमोडे यांनी पटकविला.
दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी पासून पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील कवायत मैदानावर खेळल्या गेलेल्या 23 व्या नंदुरबार जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांचे नंदुरबार जिल्ह्याचे प्रमुख व सत्र न्यायाधीश राजेश तिवारी व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत समारोप समारंभ संपन्न झाला.
पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील कवायत मैदानावर खेळल्या गेलेल्या 23 व्या नंदुरबार जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये पोलीस मुख्यालय, नंदुरबार विभाग, शहादा विभाग, अक्कलकुवा विभाग असे 4 संघ हे सांघिक व वैयक्तिक खेळ यामध्ये स्विमींग, कुस्ती, ज्युडो, बॉक्सींग, वेटलिफ्टींग, 100, 200, 400, 800 मीटर धावणे, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. प्रत्येक संघामध्ये साधारणतः 30 खेळाडु असे एकुण 120 सांघिक व वैयक्तिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
तीन दिवसांपासून जिल्हा पोलीस दलाच्या कवायत मैदानावर खेळल्या गेलेल्या 23 व्या जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत नंदुरबार विभाग संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले आहे. सर्वोत्कृष्ट पुरुष अथलेटिक्सचा पुरस्कार पोलीस शिपाई हेमंत बारी, सर्वोत्कृष्ट महिला अॅथलेटिक्सचा पुरस्कार महिला पोलीस शिपाई निंबाबाई वाघमोडे यांनी पटकविला.
सांघिक व वैयक्तिक खेळामध्ये पदक प्राप्त खेळाडूंचा नंदुरबार जिल्ह्याच्या नंदुरबार जिल्ह्याचे प्रमुख व सत्र न्यायाधीश राजेश तिवारी व पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.
23 व्या नंदुरबार जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभप्रसंगी उपस्थित पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदारांच्या कुटुंबीयकरीता संगीत खुर्ची, लिंबु चमचा, मटकी फोड़, रस्सी खेच इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले होते. तसेच सदर कार्यक्रमास उपस्थित असलेले नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सर्व वरिष्ट अधिकारी व प्रमुख पाहुणे यांच्यात रस्सी खेच हा सामना उत्कंठा वाढविणारा होता.
पोलीस अधिकारी व पोलीस अमलदारांच्या कुटुंबीयकरीता आयोजीत कार्यक्रमात विजते ठरलेल्यांना देखील यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे प्रमुख व सत्र न्यायाधीश श्री. राजेश तिवारी यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
त्याचप्रमाणे 23 व्या जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये वैयक्तीक क्रीडा प्रकारामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या पुरुष पोलीस अमलदार, महिला पोलीस अमलदार व सांघिक क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय, तृतीय आलेल्या संघचे अभिनंदन करुन कौतूक केले. तसेच 23 व्या जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन पुढील काळात होणा-या नाशिक विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धा व महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा यात सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

तसेच जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक खेळातून प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंची परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात येत असते.
23 व्या जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोप प्रसंगी नंदुरबार जिल्ह्याचे प्रमुख व सत्र न्यायाधीश राजेश तिवारी, पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील नंदुरबार जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सदाशिव वाघमारे यांचेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस खेळाडु उपस्थित होते.








