शहादा l प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशभरात साजरा झालेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या राष्ट्रीय अभियानाच्या सप्ताहात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे एकूण 325 बांबू, सीताफळ, चिंच, बेहडा, आवळा आदी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
राष्ट्रीय सेवा योजना एककाचे दत्तक गाव पुरुषोत्तमनगर येथे अभियानाचे उद्घाटन 125 वृक्ष लागवड करून करण्यात आले. पुरुषोत्तमनगर येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिलाफलक अनावरण, स्वातंत्र्य सेनानींच्या कुटुंबीयांचा सन्मान, रॅली, पंच प्रण शपथ ई. उपक्रम आयोजित करण्यात आले होते.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त बहिणाबाईंना प्रतिमा पूजन करून अभिवादन देण्यात आले. नामविस्तार दिन प्रसंगी महाविद्यालयात गोमाई नदी काठावर, बॉटनीकल गार्डन, प्रयोगशाळा परिसरात 75 वृक्ष लावण्यात आले. स्वातंत्र्य दिनी महाविद्यालय परिसरातील गोमती नदीकाठावर, एकलव्य वसतिगृह शेजारी 125 रोपट्यांची लागवड करण्यात आली.वात्सल्य सेवा समिती, नंदुरबार व वन विभाग कार्यालय शहादा यांच्याकडून मोफत रोपांची सोय झाली. मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती कल्पना पटेल यांच्या सहकार्याने रोपे उपलब्ध करून देण्यात आली.
या अभियानाच्या समारोप कार्यक्रमात वन विभाग शहादा येथील वनक्षेत्रपाल ए.पी.मेढे, वनपाल दीपक जमदाळे जयनगर यांच्या समन्वयाने बी.एल. राजपूत, पी.एम. सोनार, संतोष राठोड, अनिल तावडे, गुलाब वसावे, फुगऱ्या वसावे, बालाजी इंगळे, नवीन मिर्झा आदी वनविभाग अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करून सहभाग नोंदवला. पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायत सरपंच श्रीमती कोकिळाबेन पाटील, उपसरपंच श्रीमती जयश्री मुकेश पटेल, ग्रामविकास अधिकारी एम.बी. चव्हाण, सातपुडा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील आदी मान्यवरांनी वृक्ष संवर्धनासाठी यथोचित सहकार्याची हमी दिली.
महाविद्यालय परिसरातील लावलेली सर्व वृक्ष सुरक्षित जागेवर असून वेळोवेळी त्यांची देखरेख व काळजी रासेयो स्वयंसेवकांकडून घेतली जाणार आहे. प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील, उपप्राचार्य प्रा.एम.के.पटेल, प्रा.एस.डी. सिंदखेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत सप्ताहातील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर दीपक पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, उपप्राचार्य डॉ. एम. के. पटेल, डॉ. एस. डी. सिंदखेडकर यांनी अभियानाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल अभिनंदन केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.राजेंद्र पाटील, डॉ.वर्षा चौधरी, डॉ.वजीह अशहर, प्रा. रंजना गावित,प्रा.उर्मिला पावरा व रासेयो स्वयंसेवकांनी अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.








