नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा पालिकेचा लोकमान्य टिळक टाऊन हॉल सर्वसामान्यांसाठी खुला करावा अशा मागणीचे निवेदन शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, शहादा पालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांनी लोकमान्य टिळक टाऊन हॉलचे नूतनीकरण व सुशोभीकरणाच्या निर्णय घेतला .यासाठी राज्य शासनाच्या अनुदानातून 4 कोटी 22 लाख 63 हजार 502 रुपयाची निविदा मंजूर ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आला. सदर भव्य इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात लोकार्पण केलेले आहे. असे असतानाही गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून सदर इमारतीच्या वापर शहादे गावातील नागरिकांना करता येत नाही आहे . आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सदर इमारत खुली करण्यात यावी यासाठी प्रशासक व मुख्याधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार निवेदनाद्वारे पाठपुरावा करीत आहोत मात्र प्रशासकांनी यावर अद्याप पर्यंत कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही.
याबाबत चर्चा करून लेखी निवेदन दिल्यानंतरही इमारत कार्यान्वित करण्यात आलेली नाही .वास्तविक सदर इमारत ही शहादे कराच्या वापरासाठी असली तरी ती खुली नसल्याने बंद पडली आहे यामुळे शासकीय अनुदान खर्च होऊन याचा लाभ शहादेकारांना मिळत नाही त्याचप्रमाणे या इमारतीच्या माध्यमातून पालिकालाही आर्थिक उत्पन्न मिळणार आहे परंतु इमारत बंद असल्याने एकीकडे पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे तर दुसरीकडे शहादेकरांना त्यांचे वैयक्तिक सार्वजनिक कार्यक्रम करता येत नाही .
सदर इमारत तत्काळ शहादे करासाठी खुली करण्यात यावी, त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षात कुठलाही ठोस निर्णय न घेणाऱ्यांवर पालिकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आले आहे. यावेळी सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना देण्यात आले यावेळी विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी ,शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी, विनोद चौधरी, रमेश पाटील उपस्थित होते.








