नंदुरबार l प्रतिनिधी
गेल्या ६ दशकांपासून जिल्ह्यात ज्ञानदानाच्या वसा घेतलेल्या नंदुरबार तालुका विधायक समितीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १७ लाख रुपये दिले आहेत.संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जून महिन्याच्या एका दिवसाच्या पगार व संस्थेकडील असलेल्या रकमेच्या धनादेश मंगळवारी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.
नंदुरबार तालुका विधायक समिती ही शैक्षणिक संस्था अदिवासी अतिदुर्गम भागामध्ये शिक्षणाचे पवित्रकार्य गेल्या 60 वर्षापासुन करीत आहे.संस्थेच्या माध्यमातून हज्जारोवर लोकांना रोजगाराची साधन उपलब्ध झाली आहेत. शिक्षणाच्या कार्यासह सामाजिक बांधिलकीतून अनेक उपक्रम नेहमी राबविण्यात येत असतात.अलीकडील काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आवाहन केले होते.
त्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजाप्रती आपण काही देणे लागतो या भावनेतून नंदुरबार तालुका विधायक समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विधायक निर्णय घेत जून महिन्याच्या एका दिवसाच्या पगाराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देऊ केली आहे.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन 16 लाख 86 हजार 786 रकमेच्या धनादेश सुपूर्द केला. याप्रसंगी नांदेडचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर उपस्थित होते. नंदुरबार तालुका विधायक समितीचे कार्य निश्चितच प्रेरणादायी असून शैक्षणिक वर्तुळात संस्थेचे कौतुक करण्यात येत आहे.








