Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

२३० निर्भया युवतींना स्व-संरक्षणाचे धडे

team by team
August 20, 2023
in राज्य
0
२३० निर्भया युवतींना स्व-संरक्षणाचे धडे

नंदुरबार l प्रतिनिधी

महिला स्वसंरक्षण आज काळाची गरज बनली असून येथील जिजामाता एज्युकेशन सोसायटी संचलित फार्मसी कॉलेज येथे आयोजित दोन दिवशीय महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर पार पडले. यात सुमारे २३० निर्भया युवतींनी उत्स्फुर्तपणे आपला सहभाग नोंदविला.

ऑल महाराष्ट्र थांगता असोसिएशन व राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण तसेच नंदुरबार जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सुमारे साडे तीन लाख युवतींना स्वसंरक्षणाचे धडे शिकविन्याचा उपक्रम ऑल महाराष्ट्र थांगता असोसिएशनचे सचिव महावीर धुळधर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.

या अनुषंगाने येथील फार्मसी कॉलेजमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ.श्री आर.आर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉ.पी.व्ही.गोमासे, डॉ.सौ.जयती गोखले, प्राचार्य एल.जी.शहा, प्रा.व्ही.एम.बोरसे, डॉ.आय.टी.अन्सारी, प्रा. सरोज वळवी, प्रा.जयश्री नाईक, प्रा.मनिषा गावित, प्रा.विनोद चौरे, प्रा.मनिषा पाटील, प्रा किशोर राठी, प्रा राजेश कुवर, प्रा.रिना पाटील, प्रा.विशाल कलाल, प्रा. मनेश कोकणी, प्रा.राहुल गांगुर्डे, प्रा.भाग्यश्री मोरे, प्रा.वनिता मराठे आदी उपस्थित होते.

यावेळी गणेश मराठे म्हणाले की, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. महिलांनी सक्षम होणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी सर्व प्रथम महिलांनीच स्वतः जागृत व्हावे. यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक आहे.

तसेच महिलांनी लक्षात ठेवावे आपल्या स्वतः जवळ असणार्‍या साधनाचा वापर देखील आपल्याला करता आला पाहिजे. उदा. टाचन पिन, पर्स, ओडणी, टोकदार पेन, मिरची पावडर, स्प्रे इ. ने सुध्दा आपण आपला बचाव करू शकतो, त्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. शिबिरामध्ये जवळपास २३० मुलींनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षण शिबिराचे ट्रेनिंग कोच म्हणून सेंट मदर तेरेसा हायस्कूल आणि ज्यु.कॉलेजचे क्रीडा शिक्षक संतोष मराठे, गणेश मराठे यांनी सर्व युवतींना महत्वाच्या टिप्स दिल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

छायाचित्रकारांशिवाय कुठलेही कार्य पूर्ण होत नाही: माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी

Next Post

आदिवासी बांधवांच्या कृषिपुरक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘जो जे वांछील ते तो लाहो’ प्रमाणे धोरण : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add