Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धक्कादायक! पैसाच पैसा पाहून त्याचा इमान फिरला, अन कॅश भरणा करणाऱ्या व्हॅनमधील कर्मचाऱ्यानेच पळविली एक कोटींची रक्कम

team by team
August 15, 2023
in क्राईम
0
खळबळ बातमी : एटीएम मध्ये भरण्याचे एक कोटी घेऊन कर्मचारी पसार

नंदूरबार l प्रतिनिधी

ए.टी.एम.मशीनमध्ये कॅश भरण्यासाठी दिलेली १ कोटी ५ लाख रुपयांची रोकड कर्मचाऱ्याने लंपास केल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.

नंदुरबार येथील स्टेट बॅँकेतून रायटर कार्पोरेशन कंपनीचे कर्मचारी एक कोटी ५ लाख रुपयांची रक्कम घेऊन विविध एटीएमध्ये भरणा करण्यासाठी निघाले. शहरातील धुळे चौफुलीजवळ सदरची व्हॅन थांबवून एका फायनान्स कंपनीकडून कॅश कलेक्शनसाठी काही जण गेले होते. तेवढ्यात कंपनीचा कर्मचारी असलेला नंदुरबार येथील राकेश चौधरी याने मिळालेल्या वेळेत पोलिस मुख्यालय तसेच विविध ठिकाणच्या एटीएमध्ये भरणा करुन येतो असे सांगून व्हॅनमधील एक कोटी ५ लाखांची रोकड ताब्यात घेऊन तो दुचाकीने निघाला.

यावेळी व्हॅनमध्ये सुरक्षारक्षक, एक कर्मचारी व चालक असे तिघेजण होते. राकेश रक्कम घेऊन जाण्यास तास-दीड तासांचा कालावधी उलटल्यानंतरही तो परत न आल्याने व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी कंपनीशी संपर्क साधला. यानंतर कंपनीने राकेशशी संपर्क साधल्यानंतर त्याचा मोबाईल देखील बंद येत होता. यामुळे तो रफुचक्कर झाल्याची खात्री पटल्याने कंपनीने ११२ क्रमांक डायल केला. यानंतर घटनास्थळी पोलिस पथक रवाना झाले. मात्र तोपर्यंत सुमारे दोन ते अडीच तासांचा कालावधी उलटला होता.

घटनास्थळी अपर पोलिस अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर आदींनी पथकासह भेट दिली. दरम्यान, सदरची व्हॅन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. एटीएममध्ये भरणा करायाची रक्कम सात एटीएममध्ये जमा केली जाणार होती. यामध्ये पोलिस मुख्यालय येथील एटीएम, आमदार कार्यालयाजवळील एटीएम, एसबीआय इनटचचे एटीएम, शास्त्री मार्केटमधील एटीएम व दोंडाईचा येथील दोन एटीएममध्ये सदर रकमेचा भरणा केला जाणार होता.

मात्र त्याआधीच राकेशने सदर रकमेचा अपहार केल्याचा संशय कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, सदर घटनेनंतर पोलिस यंत्रणेने तपासाची चक्रे गतिमान केली असून ठिकठिकाणी नाकाबंदी देखील केली आहे. शहर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हा शाखेच्यावतीने ठिकठिकाणी पोलिस पथक देखील रवाना करण्यात आले आहेत. पोलिसांनी व्हॅनमधील इतर कर्मचाऱ्यांना देखील ताब्यात घेतले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रशासन सज्ज :आता दुध भेसळ करणाऱ्यांविरुद्ध होणार दंडात्मक कारवाई

Next Post

नर्मदा खोऱ्यातील महाराष्ट्राच्या हिस्स्याचे पाणी उचण्याच्या सर्वेक्षणास मान्यता : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add