नंदूरबार l प्रतिनिधी
येथील एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार द्वारा राबविण्यात येणाऱ्या “मेरी मिट्टी मेरा देश” ह्या उपक्रमांतर्गत आदिवासी दिनाचे औचित्य साधून शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यातील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेले निसर्गरम्य ठिकाण “दापुर” येथे एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले तेथे विद्यार्थ्यांनी ट्रेकिंगचा मनमुराद आनंद लुटत तेथील ओसाड माळरानावर वड,पिंपळ, कडूलिंब,बदाम ह्या रोपट्यांचे वृक्षारोपण केले यावेळी शाळेतील 50 विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेत भोजनाचा आस्वाद देखील घेतला,
धबधब्यापर्यंत सर्व विद्यार्थी व शिक्षकानीं जंगलातील पायवाटेने जात दाट झाडी, उंच असेलेले डोंगर तसेच नदीमधून जाणाऱ्या पायवाटे द्वारे थेट धबधब्या जवळ जाऊन भिजण्याचा सर्वांनी आनंद लुटला. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षक मीनल वळवी, अविनाश सोनेरी, प्रसाद दीक्षित, सतीश सदाराव, रोहन पाडवी, गौतम सोनवणे, स्वप्निल पाटील, खुशाल शर्मा, विशाल पाटील, चंद्रकांत निकम, प्रशांत पाटील, हितेश पाटील, हेमंत पाटील, रत्नदीप साळवे आदी शिक्षक उपस्थित होते.








