म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथील आदिवासी कवी संतोष पावरा हे भोपाल येथे होणाऱ्या उन्मेष आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात सहभागी होणार आहे.
साहित्य अकादमी दिल्ली आयोजित भोपाल येथे होणाऱ्या उन्मेष आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात लक्कडकोट येथील आदिवासी कवी व साहित्यिक संतोष पावरा यांना आपल्या कविता सादर करण्या साठी निमंत्रित करण्यात आले आहे. हे संमेलन दिमाक ३ ते ६ ऑगस्ट रोजी होणार आहे.या संमेलनात जगभरातील ३८ देशातील जवळपास ७० भाषांचे कवी कवी.लेखक, साहित्यिक आणि विचारवंत प्रतिनिधित्व करणार आहे.
कवी संतोष पावरा याना यापूर्वी देखील अकादमी दिल्ली च्या विविध कार्यक्रमात उपस्थिती होती कवी पावरा हे समाजकार्य चे शिक्षण घेतलेले असून व्यसन,कुपोषण, आरोग्य,शिक्षण, स्थलांतर, लोकशाही मूल्य,निसर्ग, आदिवासी साहित्य संस्कृती चळवळ व इतिहास आदी विषयावर लिखाण करतात तसेच ते आदिवासी एकता परिषद व विद्रोही सांस्कृतिक चळवलीचे कार्यकर्ते म्हणून समाजात काम करीत असताना कविता,लेख व कथा आदींच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करत सामाजिक प्रबोधन ही करीत असतात २००७ साली त्यांचे ‘ढोल’ नावाचे कविता संग्रह प्रकाशित झाले असून या संग्रहाला अनेक पुरस्कार ही मिळाले आहेत .
साहित्य अकादमी च्या या संमेलनात सहभागी होण्याची संधी कवी संतोष पावरा यांना मिळाल्याबद्दल जेष्ठ विचारवंत वाहरू सोनवणे,पावरा बरेला समाज संघटनेचे अध्यक्ष आप. नामदेव पटले,सुरेश मोरे,जेलसिंग पावरा,चंद्रसिंग बर्डे, मनोज पावरा, बबन निकुंभ,जूगणु पटेल आदी चळवळीचे नागरिकांनी व मिञ परिवारानी त्याचे अभिनंदन केले आहे.