Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ग्रामपंचायतीत दोन उपसरपंच निवडीसाठी पठ्याने केली थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

team by team
July 10, 2023
in राजकीय
0
ग्रामपंचायतीत दोन उपसरपंच निवडीसाठी पठ्याने केली थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

म्हसावद। प्रतिनिधी

राज्यातील दोन उमुख्यमंत्र्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मध्ये दोन उपसरपंच निवडीची तरतुद करण्यात यावी व त्याबाबतचे परिपत्रक काढून अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात यावेत असे निवेदन गणेश खर्डे राज्य उपाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात सद्या सरकारने आपल्या सोयीसाठी दोन उपमुख्यमंत्री निवडले असून, तशाच प्रकारे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे सर्व ग्रामपंचायत मध्येही दोन उपसरपंच निवडण्याबाबत शासन स्तरावर तात्काळ विचार व्हावा.

तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक गावा-गावातही अनेक गट असतात, त्या गटापैकीच अनेक जण ग्रामपंचायत सदस्य म्हणून वेगवेगळ्या पॅनेल मधून निवडून आलेले असतात. ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर प्रत्येकालाच सरपंच किंवा उपसरपंच हे पद मिळावे अशी अपेक्षा सर्वांचीच असते. त्यातच सरपंचपद राखीव असले तर इतरांना म्हणजे सर्वसाधारण खुल्या सदस्यांना संधी मिळत नाही. त्यातून अनेक जण नाराज होतात, सदस्यांची फोडाफोडी होते व काही वेळा सदस्यांची पळवा पळवी देखील होते काही वेळा यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार देखील होतो त्यातूनच गाव पातळीवर मोठा तणाव निर्माण होऊन वाद विकोपाला जातो त्यामुळे दोन गटात भांडणे होतात व त्याचे दुष्परिणाम गावच्या विकासावर तर होतातच व गावात देखील राजकिय वातावरण दूषित होते .

त्यामुळे शासनाने दोन उपमुख्यमंत्र्यां प्रमाणेच दोन उपसरपंच निवडण्याची तरतूद केली तर अनेक ग्रामपंचायत सदस्यांना पाच वर्षांच्या कालावधीत उपसरपंच होण्याची संधी मिळेल व सर्वांना आपल्या मर्जीप्रमाणे ग्रामविकसात योगदान देता येईल.

यासंदर्भात शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन परिपत्रक काढावे व त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शरद पवारांचे हात अजून बळकट करण्यासाठी कटिबद्ध : महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे 

Next Post

धुळे-इंदूर रेल्वे मार्ग लवकर पूर्ण करणार; सुलवाडे-जामफळ योजनेच्या कामास निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add