नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीसपदी संदिप बेडसे यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे नियुक्तीपत्र नुकतेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.
शरदचंद्रजी पवार यांच्या आदेशाने माजी मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टी च्या प्रदेश सरचिटणीसपदी संदिप बेडसे यांची नियुक्ती केली असून याबाबतचे नियुक्तीपत्र संदिप बेडसे यांना दिले.
यावेळी आमदार रोहित पवार, आ.सुनिल भुसारा, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब भाई शेख,प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील आधी उपस्थित होते,पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखविणे व पक्षाची नव्याने बांधणी करण्याचे काम मी अविरत प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करित राहणार असल्याचे प्रदेश सरचिटणीस संदिप बेडसे यांनी सांगितले.








