अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा शहरातील विविध भागात पक्क्या रस्त्यांची सोय व्हावी यासाठी विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नातून अक्कलकुवा शहरात सुमारे 40 लाख रुपये खर्चाच्या पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे.
अक्कलकुवा शहरातील कच्च्या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन काम मंजुर करुन घेतले होते. यावेळी अक्कलकुवा शहरातील पृथ्वीसिंह पाडवी यांच्या घरा समोरील रस्त्यावर,दर्गा रस्त्यावर तसेच इंदिरा नगर या भागातील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी,नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी तसेच अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या सरपंच उषाबाई बोरा यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी व्हाईस चेअरमन अशोक पाडवी,अक्कलकुव्याचे उप सरपंच इम्रान मक्राणी, विनोद वळवी, कुवरसिंग पाडवी, घंटाणीचे सरपंच विकेश पाडवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश तडवी, कुणाल जैन, माजी सरपंच राजेंद्र वसावे, आनंद वसावे, नटवर पाडवी, माजी सरपंच छोटूलाल पाडवी, रावेंद्रसिंह चंदेल, रोहित चौधरी, दिपक वळवी, रोहित सोनार, किशोर परदेशी, हुजेफा बलोच आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








