अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील विविध गावात विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नातून सुमारे चार कोटी सत्तर लाख रुपये खर्चाच्या पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे.
या पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांच्या हस्ते विविध गावात करण्यात आले. गावातील कच्च्या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून तालुक्यातील उमरकुवा, टावली, चांदपुर, उदेपुर, खडकुना, सिंगपूर, मांडवीआंबा, जानीआंबा, विरपुर, अक्कलकुवा, महूपाडा, लालपुर, काकडखुंट, कोयलीविहीर, कोलवी, कोलवीमाळ, बाबानगर,मे.अंकुशविहिर, आदी गावांसाठी गावांतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम मंजूर करुन आणले होते.
त्याप्रमाणे उमरकुवा, टावली, चांदपुर, उदेपुर, खडकुना, सिंगपूर, मांडवीआंबा,महूपाडा, लालपुर, काकडखुंट
इत्यादी गावांमध्ये भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, कोयलीविहिरच्या सरपंच जवराबाई पाडवी, टावलीच्या लोकनियुक्त सरपंच बबिता वसावे, पेचरीदेवचे सरपंच वसंत वसावे, खडकुनाचे सरपंच दशरथ वसावे, काकडखुंटच्या सरपंच ललिता वळवी, यांच्यासह शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी व्हाईस चेअरमन अशोक पाडवी, विनोद वळवी, कुवरसिंग पाडवी, रायसिंग पाडवी, तुकाराम वळवी, घंटाणीचे सरपंच विकेश पाडवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश तडवी, काना नाईक, कुणाल जैन, माजी सरपंच राजेंद्र वसावे, आनंद वसावे, नटवर पाडवी, माजी सरपंच छोटूलाल पाडवी,उप सरपंच इम्रान मक्राणी, रावेंद्रसिंह चंदेल, रोहित चौधरी, दीपक वळवी, रोहित सोनार, हुजेफा बलोच, किशोर परदेशी, आदीं सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








