म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गावातून पोलीस दलातर्फे पथसंचलन करण्यात आले.

नंदुरबार जिल्हा पोलिस अधिक्षक पी.आर. पाटील,अपर पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद पोलिस ठाणे येथे सी.आर. पी.एफ. फोर्स. नवी मुंबई प्लाटूनचे जतीन किशोर (समादेशक १०२ बटालियन) च्या देखरेखीत, सहायक समादेशक संतोष कुमार यादव, पोलिस निरीक्षक सुरेंन्द्र प्रसाद पटेल,पोलिस निरीक्षक एल.अशाहरी २,पोलिस उपनिरीक्षक १०,सहायक उपनिरीक्षक ६० जवान यासह म्हसावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे
म्हसावद पोलिस ठाण्याचे 20 कर्मचारी यांनी म्हसावद गावातील धार्मिक स्थळे,संवेदशिल स्थळे,मर्म स्थळे,संमिश्र वस्ती इत्यादी स्थळांची पाहणी करुन पथसंचलन म्हसावद पोलिस ठाण्यापासुन सुरुवात करत पथसंचल,मच्छी मार्केट,मुख्य बाजारपेठ,बहिरिम चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,राम मंदिर परिसर, धनगर गल्ली , अहिल्याबाई चौक, कुबेर हॉयस्कुल , राणीपुर फाटा आदि भागातून करण्यात आले.सकाळी 11.45 वा. सुरुवात करून 12.45 वा. रूट मार्च म्हसावद पोलिस ठाणे येथे समाप्त करण्यात आला.








