नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुका युनियन डीएनई- १३६ शाखेची कार्यकारिणी गठित करण्यात आली. यात तालुका अध्यक्षपदी के.जी.खर्डे तर उपाध्यक्षपदी नाना के.वळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
धडगाव येथे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई – १३६ शहादा शाखेची नवीन कार्यकारिणीच्या निवडीसाठी बैठक झाली. यात धडगाव तालुका अध्यक्षपदी के.जी.खर्डे तर उपाध्यक्षपदी नाना के.वळवी, महिला उपाध्यक्ष सौ. टी. टी.पावरा, सचिव देविदास देसले, कोषाध्यक्ष डी.पी. माळी, सहसचिव डी.एस.पाटील, तालुका संघटक रोहिदास पावरा, महिला सदस्य उषा बी.वळवी, जी.पी.गोकुळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निरीक्षक म्हणून जिल्हा अध्यक्ष हम ग्रामसेवक संघटना रवींद्र रणजीत वळवी व जिल्हा सरचिटणीस दौलत कोकणी यांच्या अध्यक्षतेखालील धडगाव तालुका ग्रामसेवक संघटना कार्यकारणी निवड करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.








