नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील बागवान गल्ली परिसरातील वादग्रस्त फलकासह शहरातील विविध चौकातील सुमारे 10 फलक पोलीस प्रशासनाने हटविले आहे.
जिल्हाधिकारी मनिषा खत्री, कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या आदेशान्वये सदर वादग्रस्त फलकासह शहरातील सोनार खुंट,जळका बाजार,बागवान गल्ली, बाहेरपुरा, नेहरू पुतळा, अंधारे चौक, धुळे रोड, नाट्यमंदिर आदी ठिकाणच्या फलके हटविण्यात आले आहे.
यामुळे शहरात कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवु नये सर्वत्र शांतता राहावी या दृष्टीने पोलीस अधीक्षक पी. आर .पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
शहरातही पोलिसांची पेट्रोलिंग सुरू असून चौका चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवणे शहरात शांतता ठेवावी असा अहवाल पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.








