नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील बागवान गल्ली परिसरातील वादग्रस्त टिपू सुलतान नामक फलक हटवीण्याची मागणी भाजपा महामंत्री विजय चौधरी यांच्या नेतृत्वात जिल्हा भाजपा तसेच हिंदुत्ववादी संघटनांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
या निवेदनाची दखल घेत कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मनिषा खत्री, कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या आदेशान्वये सदर वादग्रस्त फलक काढण्यात आला असून यामुळे शहरात कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवु नये सर्वत्र शांतता राहावी या दृष्टीने पोलीस अधीक्षक पी. आर .पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.शहरातही पोलिसांची पेट्रोलिंग सुरू असून चौका चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवणे शहरात शांतता ठेवावी असा अहवाल पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.








