नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील भरडू येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांना सकाळी जागतिक योगा दिवस निमित्त योगासनाची प्रात्यक्षिक घेण्यात आले.
शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना प्राथमिक मुख्याध्यापक जितेंद्र कुवर यांनी प्रत्येक व्यक्तिने निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगा करने काळाची गरज आहे. हा संदेश योगादिनी देण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योगासनाचे महत्त्व पटवून देत कपालभाती, अनुलोम -विलोम, प्राणायाम, ताडासन, भूजंगासन, मयूरासन, व्रूक्शासन, पाश्चोतासन, सेवासन योगा प्रात्यक्षिक करण्यात आले.
यावेळी प्राचार्य महेंद्र वळवी, अधीक्षक धर्मा मावची, अधीक्षिका पूनम धनगर, प्राध्यापक विजय भदाणे, शिक्षक प्रशांत राजपूत, वासुदेव पटेल यांच्यासह आश्रम शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी शारिरीक आणि मानसिक स्वाथ्यासाठी मोठ्या उत्साहात योगासने केली.








