नंदूरबार l प्रतिनिधी
21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जात असतो,या दिवशी जवळ जवळ जगभरातील 128 देश आहेत त्यांच्यापैकी जास्तीत जास्त देश योग दिवस साजरा करत असतांना योग दिवसाच्या माध्यमातून विविध प्रकारचे त्या ठिकाणी आसनं,प्राणायाम करत असतात.मोठ मोठ्या देशातील पंतप्रधानापासून राष्ट्रपतिंपासून
मोठे मोठे व्यक्तिमत्त्व या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये स्वतःचे योगदान देत असतात,की जेणे करून निरामय आणि आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी योगाचे महत्त्व किती आहे.
हे त्या ठिकाणी योग दिवसाच्या माध्यामातून सांगितल जात असतं त्याचपद्धतीने विशिष्ट प्रकारच्या संस्था ,कार्यालय त्याठिकाणी योग दिवसाच्या माध्यमातून गाव पातळीवर, शहर पातळीवर विशिष्ठ प्रकारे लोकांच्या माध्यमातून साजरा करत असतात त्याच औचित्याने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये रोज संध्याकाळी त्याठिकाणी बालसंस्कार केंद्राचा कार्यक्रम होत असून याठिकाणी रोज संध्याकाळी बालसंस्कार केंद्र घेतला जात असतो
त्यामध्ये बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातुन योग दिवसाचे व योगाचे महत्त्व आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे याची माहिती सेवेकऱ्याकडून देण्यात आली त्याचपद्धतीने योग दिवसाचे माध्यमातून विशिष्ट प्रकारचे जे आसनं असतात ते त्यांच्याकडून करून घेन्यात आले ,या योग्य दिवसाच्या शिबीरा मध्ये बालसंस्कार च्या मुलानी सहभाग नोंदवला.








