नंदूरबार l प्रतिनिधी
भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात तृष्टीकरणाचे राजकारण होते.गेल्या 9 वर्षाच्या मोदी सरकारच्या काळात सेवा,सुशासन व गरीब कल्याण याचा संगम विविध कामातून देशाने प्रगती केली आहे. 2024
च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकास कामांच्या आधारावर निवडणूक लढविणार असल्याचे भाजपा राष्ट्रीय महामंत्री कैलास विजयवर्गीय यांनी सांगितले.
नंदूरबार येथे मोदी @9 अभियानानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा राष्ट्रीय महामंत्री कैलास विजयवर्गीय यांनी सांगितले.की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षाच्या कार्यकाळात देश वेगळ्या उंचीवर गेला आहे.देशात उल्लेखनीय कामे झाली आहेत.9 वर्षाच्या काळातील रिपोर्ट कार्ड खूप मोठे आहे.नंदूरबार लोकसभेच्या खा.डॉ.हीना गावित यांच्या प्रयत्नातून खान्देश एक्सप्रेस रेल्वे सुरू झाली.आहे.प्रत्येक विकसित देश तेथील साधन संपत्ती यावर ठरत असते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरात चांगल्या रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे.अनेक चांगल्या रेल्वे सुरू झाल्या आहेत.अशा अनेक कामांमध्ये भारताची जी डी. पी.चांगल्या स्थितीत असून इतर देशांच्या तुलनेत भारतात महागाई दर कमी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हा मूलमंत्र देत 9 वर्षाच्या कार्यकाळात सेवा,सुशासन व गरीब कल्याण याचा संगम विविध कामातून देशाने प्रगती केली आहे.जनधन खात्याच्या माध्यमातून लाभार्थ्यांना संपूर्ण पैसा त्याला मिळत आहे.त्यामुळे दलालीला चाप बसला आहे.मोदी सरकारची निती व नियत साफ असल्यानेच अनेक विकास कामे होऊ शकले.सर्व गरिबांना 2024 पर्यंत पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यात येणार आहे. इंडिया स्टार्टअप च्या माध्यमातून आतापर्यंत 43 हजार 800 करोड ची मदत करण्यात आली असून 9 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.मागील निवडणुकीत दिलेले वचन राम मंदिर, 307 हटवणे आदी वचननामांची पुर्तता केली असून 2024 पर्यंत सर्व वचननामांची पूर्ती करण्यात येणार असल्याचे सांगत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची पताका जगभरात पसरली असून जगात भारतीयांना सन्मान मिळत आहे.
दरम्यान एका प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले की, राज्यासह देशाच्या विविध भागात होत असलेल्या दंगली आणि नक्षली कारवायांमध्ये थेट विदेशी शक्तीचा हात असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे. छत्तीसगढमध्ये पकडलेल्या नक्षलवाद्यांकडे चीनची हत्यारे मिळाली. यावरुनच अशा घटनांना विदेशी रसद मिळत असल्याचे विजयवर्गीय यांनी सांगितले. कॉग्रेस शासीत राज्यातच लव्ह जिहादच्या घटनांची संख्यामोठी असून भाजपा शासीत राज्यात अशांवर कठोर कारवाई होत असल्याने असा घटना नियंत्रीत असल्याचे देखील कैलाश विजयवर्गीय म्हणाले आहेत.भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात तृष्टीकरणाचे राजकारण होते.मात्र आम्ही विकास कामांच्या जोरावर मते मागत असतो.
2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात याच विकास कामांच्या आधारावर निवडणूक लढविणार असल्याचे भाजपा राष्ट्रीय महामंत्री कैलास विजयवर्गीय यांनी सांगितले.यावेळी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजकुमार गावित, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजय चौधरी, खा.विनय तेंडुलकर, खा.डॉ.हीना गावित,जिल्हा परिषद अध्यक्षा do गावित आ.जयकुमार रावल आ.राजेश पाडवी, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, लोकसभा निवडणूक प्रमुख तुषार रंधे आदि मान्यवर उपस्थित होते.








