नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार डॉ.हिना विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त अर्हत प्रतिष्ठान नंदुरबार वतीने २४ ते २९ जून २०२३ दरम्यान “खासदार चषक” भव्य क्रीडा सप्ताहाचे आयोजन अर्हत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी केले आहे.
क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन दि.२४ जुन शनिवार रोजी सकाळी 11 वाजता श्रॉफ हायस्कूल येथील साईबाबा हॉल येथे बुद्धिबळ स्पर्धेपासून करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. डॉ. हीना विजयकुमार गावित प्रमुख पाहुणे नंदुरबार जि. प. अध्यक्ष डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित, श्रॉफ हायस्कूल प्राचार्य सौ.सुषमा शहा, उपप्राचार्य राजेश शहा आदी मान्यवर उपस्थित राहतील.
२५ जुन रविवार रोजी सकाळी ११ वाजता एस.ए.मिशन हायस्कूल येथे १४ वर्षे मुले व १७वर्षे मुली फुटबॉल स्पर्धा
२६ जुन सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजता जेनी पार्क, बाबा रिसॉर्ट समोर बॉक्स क्रिकेट सिक्स साईड टूर्नामेंट 14 वर्षे वयोगट मुले व मुली
२९ जुन २०२३ शुक्रवार रोजी लाडकाना वाडी सिंधी कॉलनी नंदुरबार येथे जम्प रोप स्पर्धा सकाळी ११वाजता, २९ जुन २०२३ शुक्रवार रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे कराटे तथा रोल बॉल स्केटिंग स्पर्धा सकाळी १० वाजता
वरील स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थी तथा खेळाडूंनी स्पर्धेचे संयोजक मीनल वाळवी, संदीप साळुंखे,राजेश शहा, सेबीस्टन जयकर, डॉ. दिनेश बैसाणे, नंदू पाटील, रामा हटकर, योगेश कुंभार, किरण मिस्तरी, हर्षबोध बैसाने , संदीप खलाणे, विजय जगताप, डॉ.जितेंद्र भारद्वाज, सिद्धार्थ साळुंके आदींना संपर्क साधावा अशी माहिती स्पर्धेचे आयोजक सुभाष पानपाटील यांनी दिली आहे.








