नंदूरबार l प्रतिनिधी
शेतीकाम करणारा बाप आणि मोलमजुरी करणारी माय यांच्या लेकराने मोठ्या कष्टाने यश मिळवले आहे. नंदुरबार तालुक्यातील आसाणे येथील विशाल निंबा पाटील याची ज्युनिअर कमिशन ऑफिसर या पदासाठी भारतातून सात जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. भारतातून सात जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत निवड त्याची झाली असून त्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. ही परीक्षा पास झाल्यामुळे इंडियन आर्मी इंजिनिअरिंग फोर्समध्ये विशालची निवड झाली आहे.
नंदूरबार तालुक्यातील आसाणे येथील चि.विशाल निंबा पाटील यांची इंडियन आर्मी बीआरओच्या इंजिनिअरिंग फोर्समध्ये जुनिअर कमिशन ऑफिसर पदी निवड झाली आहे.नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेत त्याला हे यश मिळाले आहे देशभरात फक्त सात जागांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यात विशाल पाटील हा देशात तिसऱ्या क्रमांकावर आला. विशाल यांची घराची परिस्थिती हालाखीची असल्याने शिक्षणाची जिद्द असल्यामुळे नंदुरबार सोडून जळगाव या ठिकाणी जाऊन पार्ट टाईम जॉब करून शिक्षण घेतले व एम.एस.सी. पर्यंत शिक्षण झाल्या नंतर त्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केल्याने विशाल यास यश मिळालं,
संपूर्ण भारतातून भारतीय आर्मी इंजिनिअरिंग विभागाच्या सात जागा होत्या, या सात जागांमध्ये विशाल पाटील यांचा तिसरा क्रमांक आल्याने कुटुंबातील सदस्यांनी गावातील लोकांना पेढे भरत आनंद उत्सव साजरा केला.गावकर्यांनी विशालची गावातून भव्य मिरवणूक काढली विशाल पाटील हा ग्रामपंचायत सदस्या सौ. नर्मदाबाई निंबा पाटील व गुरुदत्त मंडप चे मालक निंबा काशिराम पाटील यांचा सुपुत्र असून स्टॅम्प वेंडर दादाभाई पाटील व पत्रकार पंढरीनाथ पाटील यांचा पुतण्या आहे. विशालला मिळालेल्या यशात आजोबा आई वडील यांचा आशीर्वाद व काकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले








