नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील रजाळेच्या रहिवासी असलेल्या तथा ह.मु.धुळे येथील सौ.निवेदिता निरंकरसिंह राजपूत यांनी गरुड भरारी घेतली असून त्यांची राज्यात नावाजलेल्या तसेच इतर देशातही नामांकित असलेल्या पुणे येथील किर्लोस्कर कंपनीमध्ये सिनियर मॅनेजरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
निवेदिता गिरासे यांनी लहानपणापासूनच चंगच धरला होता. मनात इच्छा होती की, एक दिवशी एका मोठ्या पदावर काम करावे अशी इच्छा त्यांनी मनाशी बाळगली होती. ती आज त्यांनी पूर्ण केली आहे. त्यांनी रात्रं- दिवस अभ्यासाच्या परिश्रमामुळे आज त्यांनी मोठ यश मिळवून शिखर गाठलय.या यशामागे त्यांच्या वडिलांसह त्यांचे काका यांचे देखील मोठ योगदान लाभल आहे.
निवेदिता राजपूत यांच शिक्षण धुळे येथे पूर्ण झाले आहे. त्यांच्या या यशा मागे त्यांचे पती निरंकरसिंह गिरासे यांचे देखील मोठे योगदान आहे त्यांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन केले. निवेदिता राजपूत या दिलीपसिंग गिरासे यांची कन्या तर रजाळे येथील प्रगतीशील शेतकरी दरबारसिंग गिरासे यांची पुतणी तसेच ग्रामसेवक योगेंद्र गिरासे यांची बहिण होत. रजाळेच्या कन्येने पुण्यासारख्या शहरात एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर निवड झाल्याबद्दल रजाळेसह परिसरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.








