नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा मार्फत लाभार्थींनी घेतलेल्या कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेच्या एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची सुधारित एक रकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे.
दि. 31 मार्च 2024 पर्यंत महामंडळाच्या थकीत कर्जदारांनी या योजनेचा लाभ घेऊन थकीत कर्ज भरून कर्जमुक्त व्हावे असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात येत आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, टोकरतलाव रोड,नंदुरबार (02564-210062) येथे संपर्क साधावा असे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकांनी केले आहे.








