नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे वटपौर्णिमेचे औचित्य साधून महिलांना वटवृक्ष देऊन लागवड करीत वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला आहे. हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा समन्वयक सीमा हेमंत सोनगिरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.
वटसावित्री पौर्णिमा म्हटली म्हणजे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी यादिवशी सुहासिनी महिला वटवृक्षाची पूजा करतात. गेल्या चार वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नंदुरबार जिल्हा समन्वयक सीमा हेमंत सोनगिरे यांनी वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून वृक्षारोपणाच्या उपक्रम हाती घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीही शनिवारी शहादा येथे वटसावित्री पौर्णिमेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा समन्वयक सीमा सोनगिरे यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. यावेळी सुवासिनी महिलांना वटवृक्ष देऊन लागवड करीत विधीवत पूजा करून वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला आहे. वृक्षारोपणासह महिलांनी वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला असून यातून वृक्षारोपण चळवळीला चालना मिळणार आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.








