नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील तळोदा-चिनोदा रस्त्यावर वडाचे झाड गाडीवर कोसळून एकच जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
आज दि.४ मे रोजी सकाळी १० वाजता अचानक वादळी वाऱ्याने रौद्र रुप धारण केले.त्यात सर्वांचीच तारांबळ उडाली.
प्रतातपुर ता. तळोदा येथील राजेंद्र रोहिदास मराठे (वय- ४२ ) आपल्या घराकडे जात असताना तळोदा शहराहुन १ किलोमीटर अंतरावर चिनोदा रस्त्यावर भले मोठे वडाचे झाड मराठे यांच्या मालकीची ( जी.जे.-06 जी. ई-0541) आर्टीगा गाडीवर कोसळल्याने गाडीचा वरचा पत्रा फाटून डोक्यावर पडले.या अपघातात राजेंद्र मराठे यांचा जागीच मृत्यू झाला, प्रतापपूर,रांझणी गावातील ग्रामसथांनी मृतदेह बाहेर काढला.
चिनोदा रस्त्याच्या दुतर्फा घनदाट मोठे व जीर्ण झाडे आहेत. झाडांचा धोका लक्षात घेता चिनोदा ग्रामस्थांनी झाडे काढून टाकण्याविषयी वनविभागाला निवेदनाद्वारे याआधी कळविले होते. परंतु वनविभागाने दखल घेतली नसल्याचे राजेंद्र मराठे यांना प्राण गमवावा लागला.
पंचकृशित दुःखद घटनेविषयी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.सदर घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी, तहसिलदार गिरीष वखारे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी,निसार मक्राणी घटनास्थळी दाखल झाले.