शहादा l प्रतिनिधी
शहरात गर्दी गोळा करुन दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासह पूर्व नियोजित दंगल घडविण्याचे कट कारस्थान करणाऱ्या समाज कंटकांचा बंदोबस्त होवून कारवाई करण्यात यावी अशी मागणी गांधीनगर, क्रांतीचौक येथील रहिवासी व शहादा शहरातील बंधू-भगिनीनी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा २ जुन शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता क्रिकेट खेळण्यावरुन गांधी नगर येथे किरकोळ वाद झाल्याचे निमित्त होवून गांधीनगर व क्रांती चौक येथे काही समज कंटकां लोकांनी रात्री १० वाजेच्या सुमारास अचानक मोठ्या संख्येने मोटारसाईकल वरुन लोकांना गोळा करीत एका वस्तीत हातात काठ्या दांडके घेवून अर्वाच्या भाषेत शिवीगाळ व घोषणाबाजी करीत दहशत निर्माण केली. परिसरात दहशत निर्माण व्हावी या दृष्टीने सदरचा प्रकार हा पुर्वनियोजित असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
या जमावात सुमारे २५०-३०० संख्येने एका समाजाचे नागरिकांनी गांधीनगर व क्रांती चौक या भागात धुडगुस घालत दहशत निर्माण केली. हा सर्व प्रकार भयंकर असुन साधारण क्रिकेटच्या वादातुन क्षणभरात जर दोन ठिकाणी ३०० लोकांच जमाव होवून दहशत माजवतो तर हे सर्व पुर्वनियोजित असल्याचे खात्री करायला हरकत नाही. काही मोबाईल मध्ये या जमावाची व्हिडीओ शुटींग केलेली आहे ती देखील आम्ही आपल्या सुपूर्द करीत आहोत.असे म्हणत वरील नमूद सर्व दंगलखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करावी अन्यथा तालुक्यातील तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी आ.राजेश पाडवी यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान शहादा शहरातील परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात असून शांतता आहे.कुठल्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.