नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी ते मोलगी रस्त्यावर मद्य तस्करी करणाऱ्या पिकअप वाहनासह
८ लाख २५ हजाराचा मुद्देमाल राज्य उत्पादनच्या पथकाने जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १ जून रोजी राज्य उत्पादनच्या भरारी पथकाला मिळालेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी ते मोलगी रस्त्याने मद्याची चोरटी वाहतूक होत असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने सापळा रचला असता वाहन (क्र.एम.एच.०४ डी.के.९४१६) आले असता सदर वाहन अडविण्यात आले. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात बियरचे ८२ बॉक्स, रॉयल ब्ल्यू व्हिस्कीचे २४ बॉक्स आढळून आले. पथकाने पिकअप वाहनासह ८ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत राज्य उत्पादनचे आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, विभागीय उपायुक्त डॉ.बी.एच.तडवी, राज्य उत्पादनच्या नंदुरबार अधिक्षक स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक डी.एम. चकोर, दुय्यम निरीक्षक एस.आर.नजन, दुय्यम निरीक्षक पी.जे.मेहता, प्रशांत पाटील, सागर इंगळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मोहन पवार, जवान हंसराज चौधरी, संदिप वाघ, धनराज पाटील, भूषण चौधरी, मानसिंग वळवी, हितेश जेठ, अविनाश पाटील, हेमंत पाटील, आर.एन.पावरा, राहूल साळवे यांच्या पथकाने केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास निरीक्षक डी.एम.चकोर करीत आहेत.दरम्यान मिशन गावठी हातभट्टी मोहीमेंतर्गत महिन्याभरात राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने खांडबारा, चिंचपाडा, नवापूरा, जामावाघाडे, गोगापूर, नंदुरबार शहर व शहादा ग्रामीण, सारंगखेडा परीसरात हातभट्टी दारु व अवैध ढाबे यांच्यावर ७० गुन्ह नोंदवत ५ लाख २८ हजार ७८८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.