Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य वाचनात नव्हे तर आचरणात आणा – प्रा.डॉ.सुधाकर जाधव

team by team
June 3, 2023
in राजकीय
0
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य वाचनात नव्हे तर आचरणात आणा – प्रा.डॉ.सुधाकर जाधव
म्हसावद l प्रतिनिधी
ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. सर्वधर्मसमभाव ,अस्पृश्यता उच्चाटन ,सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांविषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड,
मूल दत्तक वारसाहक्क ,प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य गुगल, युट्यूब आणि सोशल मीडियाच्या जगात फक्त वाचनात नव्हे तर आचरणात आणा असे मत व्याख्याते प्रा. डॉ.सुधाकर जाधव यांनी नंदुरबार जिल्हा धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना,कर्मचारी महासंघ,अहिल्या महिला संघ व सांस्कृतिक महासंघ यांच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निम्मित अभिवादन व जाहीर व्याख्यान प्रसंगी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले.
 पुढे त्यांनी आपल्या भाषणातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लहानपणापासून तर त्याच्या शेवटपर्यंत संपूर्ण जीवनकार्याचा तसेच त्यांनी संपूर्ण भारतात केलेल्या विधायक व लोककल्याणकारी अशा धार्मिक व सामाजिक कार्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या याचा परिचय करून देत अहिल्यादेवी ह्या थोर समाजसुधारक तसेच प्रखर शिवभक्त होत्या मात्र त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरांचा आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवताधर्म आणि आज त्यांची 298 वी जयंती साजरा होत असताना त्यांचे जीवनकार्य केवळ ऐकून किंवा वाचन करून चालणार नाही तर तर ते आपल्या आचरणात कसे आणता येईल यासाठी प्रयत्नशील राहूया असा संदेश देत त्यांच्या विचाराला व कार्याला त्यांनी अभिवादन केले.
   कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंदा कुवर यांनी आपल्या मनोगतातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करत आयोजकांचे कौतुक केले.
  यावेळी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव व महिला वर्ग उपस्थित होते कार्यक्रमानंतर अल्पोहाराचे वाटप करण्यात आले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक  कैलास न्याहळदे,सूत्रसंचालन  रवींद्र मुजगे तसेच आभार प्रदर्शन सतिष काटके यांनी केले तर यशस्वीतेसाठी समस्त धनगर समाज महासंघ पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व समाजबांधव यांनी सहकार्य केले.
बातमी शेअर करा
Previous Post

शेती मातीचा होणार सन्मान ; कांदा पिकाला मिळणार अनुदान

Next Post

शिवराज्यभिषेक दिन व छ. संभाजी महाराज जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी

Next Post
शिवराज्यभिषेक दिन व छ. संभाजी महाराज जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी

शिवराज्यभिषेक दिन व छ. संभाजी महाराज जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add