नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १० वीचा निकाल जाहीर झाला असून यात नंदुरबार जिल्ह्याच निकाल ९३.४१ टक्के लागला आहे. यात ९२.०४ टक्के विद्यार्थी तर ९४.९३ टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले आहेत.यात नवापूर तालुक्याचा सर्वाधिक तर तळोदा तालुक्याचा सर्वात कमी निकाल लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी नंदुरबार जिल्ह्यात १० हजार ६४४ विद्यार्थी तर ९ हजार ५०० विद्यार्थिनी अशा २० हजार १४५ विद्यार्थ्यांनी होते. यापैकी १० हजार ३२२ विद्यार्थी तर ९ हजार २६५ विद्यार्थिनी असे एकूण १९ हजार ५८७ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ९ हजार ५०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने एकूण विद्यार्थ्यांपैकी ९२.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तर ८ हजार ७९६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्याने एकूण ९४.९३ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. अशा एकूण परीक्षा देणाऱ्या १९ हजार ५८७ पैकी १८ हजार २९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने नंदुरबार जिल्ह्यात दहावीचा निकाल ९३.४१ टक्के इतका लागला आहे. विभागात सर्वाधिक निकाल जळगाव जिल्ह्याचा ९३.५२ टक्के तर त्या पाठोपाठ नंदुरबार जिल्ह्याचा निकाल लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत दहावीच्या निकालात टक्केवारी घसरली आहे.
जिल्ह्यात दहावीचा निकाल एकूण ९३.४१ टक्के लागला असला तरी यात सर्वाधिक निकाल नवापूर तालुक्याचा ९५.८१ टक्के तर तळोदा तालुक्याचा सर्वात कमी ८७.६१ टक्के इतका निकाल लागला आहे. अक्कलकुवा तालुक्याचा ९१.४९, धडगाव ९३.२२, नंदुरबार ९४.०८ व शहादा तालुक्याचा ९४.२३ टक्के इतका निकाल लागला आहे.








