नंदुरबार l प्रतिनिधी
मार्च 2023 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकाल दिनांक 2 जून 2023 रोजी ऑनलाइन जाहीर झाला. शाळेची गुणवंत विद्यार्थिनी कु. रेवती दीपक माळी हिने 98.80 टक्के गुण मिळवत शाळेतून व जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. शाळेच्या एकूण 52 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त करत विशेष प्राविण्य मिळाले आहे.
शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या बहुप्रतिक्षित एस.एस.सी. बोर्ड परीक्षा निकाल आज जाहीर झाला. त्यात गुजराती माध्यमाचा निकाल 100 टक्के लागला, तर शाळेच्या एकूण निकाल 98.84% जाहीर झाला. एकूण प्रविष्ठ 319 पैकी 315 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन ॲड.रमणलाल शाह, सचिव डॉ.योगेश देसाई, मुख्याध्यापिका सौ.सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक विद्या सिसोदिया, जगदीश पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या अनुक्रम
1) रेवती दीपक माळी 98.80 टक्के प्रथम क्रमांक
2) सुमित अमृत पाटील 97.80 टक्के द्वितीय
2) संस्कृती धर्मेंद्र भारती 97.80 टक्के द्वितीय
3) अथर्व विजय भावसार 96.80 टक्के तृतीय
गुजराती माध्यमाच्या अनुक्रम
1) निष्ठा योगेशभाई मलेटे 90.80 टक्के प्रथम
2) केयूरकुमार प्रवीणभाई सूर्यवंशी ८८२५ टक्के द्वितीय
3) पार्थ योगेशभाई सोलंकी 86.40 टक्के तृतीय
3) नितेशकुमार हिराभाई ब्राह्मणे 86 40 टक्के तृतीय