Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बालविवाह होण्यापूर्वीच पोलीस पोहोचले लग्न मंडपात,धडगांव पोलीसांनी रोखला

team by team
June 1, 2023
in क्राईम
0
ढंढाणे येथे पोलीसांनी रोखला बालविवाह
नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील सिसा पाडली येथे  बालविवाह होण्यापूर्वीच धडगाव पोलीस लग्न मंडपात पोहचून बालविवाह थांबविला.
बालविवाहांना प्रतिबंध करणे तसेच महिलांविषयक कौटुंबीक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या “ऑपरेशन अक्षता” या उपक्रमासाठी 9022455414 हा हेल्पलाईन नंबर जिल्हा पोलीस दलाकडून सुरु करण्यात आला आलेला आहे याबाबत देखील नागरिकांना बैठकांमध्ये सांगण्यात येत असते व कोणत्याही गावात बालविवाह होत असल्यास त्याबाबत हेल्पलाईन नंबरवर तात्काळ संपर्क करुन माहिती देणेबाबत आवाहन करण्यात येत असून सदरच्या हेल्पलाईनवर तक्रारी प्राप्त होत आहे. 30 मे रोजी “ऑपरेशन अक्षता” या उपक्रमासाठी सुरु करण्यात आलेल्या हेल्पलाईन नंबरवर एका सुज्ञ नागरिकाने फोनकरुन माहिती दिली की, धडगांव पोलीस ठाणे हद्दीतील सिसा पाडली गावात  30 मे  रोजी एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार आहे. सदर घटनेची माहिती धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांना कळविल्याने.
त्यांनी सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करणेबाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांनी धडगांव पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलच्या सदस्यांच्या मदतीने तात्काळ माहिती काढली असता, सिसा पाडली गावातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह त्याच गावातील एका तरुणासोबत 30 मे  रोजी  सायंकाळी होणार होता, परंतु त्यापूर्वीच धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण व त्यांच्या पथकाने अल्पवयीन मुलीच्या घरी जावून अल्पवयीन मुलगी, वर मुलगा, त्यांचे कुटुंबीयांचे व गावातील नागरिक यांना कायदेशीर बाबी समजावून सांगून त्यांचे समुपदेशन करुन मनपरिवर्तन केले. अल्पवयीन मुलीच्या व वर मुलाच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली. तसेच अल्पवयीन मुलगी व वर मुलाच्या पालकांना धडगांव पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे.नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षताचे नंदुरबार पोलीसांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
तसेच ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाहाच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यात यश येईल. आता पर्यंत नंदुरबार जिल्ह्यातील 634 ग्रामपंचायतींपैकी 631 ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह विरोधी ठराव घेण्यात आले आहेत. तसेच उर्वरीत 3 ग्रामपंचायतींचे ठराव देखील लवकरच घेण्यात येतील. त्याचप्रमाणे आता पर्यंत नंदुरबार जिल्हा पोलीसांना ऑपरेशन अक्षतांतर्गत तब्बत 21 बालविवाह रोखण्यात यश आले आहे असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण, पोलीस उप निरीक्षक प्रविण महाले, पोलीस हवालदार राजेंद्र जाधव, पोलीस अंमलदार गणेश मराठे, महेश माळी, रितेश बेलेकर तसेच सिसा पाडली गावाचे पाटील कालुसिंग पिसा वळवी, पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलचे सदस्य यांनी केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

मातोश्री मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ

Next Post

तीसी येथे प्रिया पाटील व रोहिणी पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्याबाईदेवी होळकर पुरस्कार वितरित

Next Post
तीसी येथे प्रिया पाटील व रोहिणी पाटील यांना  पुण्यश्लोक अहिल्याबाईदेवी होळकर पुरस्कार वितरित

तीसी येथे प्रिया पाटील व रोहिणी पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्याबाईदेवी होळकर पुरस्कार वितरित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add