Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विना हेल्मेट दुचाकीस्वारांना कार्यालयांमध्ये प्रवेशबंदी

team by team
June 1, 2023
in राज्य
0
विना हेल्मेट दुचाकीस्वारांना कार्यालयांमध्ये प्रवेशबंदी
नंदूरबार l प्रतिनिधी
दुचाकी स्वारांनी वाहतुकीचे नियम पाळावे व त्यांना हेल्मेटचे महत्व पटावे यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्याव्दारे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालये, शैक्षणिक संस्था, बँका, मॉल्स, हॉटेल्स इत्यादींना हेल्मेट सक्ती बाबत नोटीस बजावण्यात येत असून हेल्मेट न घालणा-या दुचाकी स्वारांना त्यांच्या संस्थेत प्रवेश न देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार दुचाकीस्वाराने व त्याच्या मागील सीटवरुन प्रवास करणाऱ्या व्यक्तीने हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक आहे. असे असतानाही अनेक मोटार सायकल चालक हेल्मेटचा वापर करीत नसल्याचे आढळून आले आहे. दैनंदिन घडणा-या रस्ते अपघातात सर्वाधिक अपघात दुचाकीचे आहेत. हेल्मेट न घाताल्यामुळे मृत्युमुखी पडणान्या दुचाकी स्वारांची संख्या मोठी असून दरवर्षी राज्यात सुमारे ७००० दुचाकी स्वार रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात.
दुचाकी स्वारांनी वाहतुकीचे नियम पाळावे व त्यांना हेल्मेटचे महत्व पटावे यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्याव्दारे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालये, शैक्षणिक संस्था, बँका, मॉल्स, हॉटेल्स इत्यादींना हेल्मेट सक्ती बाबत नोटीस बजावण्यात येत असून हेल्मेट न घालणा-या दुचाकी स्वारांना त्यांच्या संस्थेत प्रवेश न देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
कलम १९४ ड अन्वये विनाहेल्मेट मोटार सायकल चालविणे किंवा चालविण्यास संमती देणे.अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असून त्यांना दंडात्मक कारवाईची तरतुद करण्यात आली आहे. एक हजार रुपये दंड व तीन महीने ड्रायव्हींग लायसन्स निलंबित करण्याची तरतूद आहे. तरी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना तसेच सर्व कार्यालये संस्था यांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपल्या कार्यालयात / आस्थापनेच्या आवारात विना हेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणान्यास प्रतिबंध करावा. स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्वानी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडेकर यांनी केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय

Next Post

कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषकतत्वे शरीराला मिळणे गरजेचे : जि प अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add