भालेर l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील भालेर येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेच्या श्रीमती कमलाताई पुरुषोत्तम पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या कला शाखेचा एकूण निकाल ८२.४५ टक्के लागला.

यात प्रथम दीपक बाळू पाटील 74.50 टक्के, नेहा भगवान पाटील 73.17 टक्के, निमा काल्या वसावे ७१.५० टक्के, योगिता भुऱ्या भिल ७१.५०टक्के चेतना गुलाबसिंग पाडवी 70.50 टक्के मिळाले. संस्थेचे अध्यक्ष भास्कर हिरामण पाटील, कार्याध्यक्ष विजय भास्कर पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, संस्थेचे सचिव, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.








