भालेर l प्रतिनिधी
भालेर ता. नंदुरबार येथे कृषी विभागामार्फत माती नमुना काढणे प्रात्यक्षिक तसेच माती नमुना सिटी वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी महाडीबीटी ऑनलाईन फॉर्म भरणे माती नमुना काढणे आदी उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी, उपविभागीय कृषी अधिकारी सी .के. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या विविध योजना विषयी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी कृषी पर्यवेक्षक सुधीर पाटील कृषी सहाय्यक जितेंद्र धगधगे तसेच ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

परिसरातील तेरा गावांमध्ये अशाच प्रकारे माती नमुना काढणे आदी भालेर नगाव तीसी,भादवड, आक्राळे,वडबारे, बलदाने ,कार्ली, निंभेल कड्रे, खोक्राळे, रनाळे आदी गावातून प्रत्येकी दोनशे माती नमुने काढण्यात येणार असून यातून शेतकऱ्यांना खताच्या मात्रा, कोणता घटक कमी आहे व जमिनीला आवश्यक आहे हे समजून येणार आहे .संतुलित खतांचा वापर करण्यास मदत होणार आहे, या कार्यक्रमाला सुरेश पाटील, नाना पाटील, महेंद्र पाटील, रमेश पाटील, गुलाब पाटील, शिवाजी पाटील, हर्षल पाटील, अनिल पाटील,गैंधल पाटील,दिनेश पाटील, भिका पाटील आदी शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते.








