नंदुरबार l प्रतिनिधी
इयत्ता 10 वी 12 वी तसेच त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यंनी घ्यावा असे आवाहन नंदुरबार चे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी केले आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणी महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या अनु. जाती व नवबौद्ध घटकातील विद्याथ्यांसाठी भोजन, निवास तसेच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे.
वर्ष 2022-23 या वर्षात प्रलंबित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या लाभाची रक्कम प्राप्त झाली असून प्रलंबित सर्व पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मंजुर करण्यात आलेला आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात पात्र विद्यार्थ्यांनी सदर योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. नांदगांवकर, यांनी केले आहे.








