Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चांदसैलीमार्गे धडगाव मिनीबस तातडीने सुरु करा :पहाडातील लोकप्रतिनिधींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

team by team
May 17, 2023
in राजकीय
0
चांदसैलीमार्गे धडगाव मिनीबस तातडीने सुरु करा :पहाडातील लोकप्रतिनिधींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुका व मोलगी परिसरातील लाखो नागरिकांना जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण नंदुरबार येथे जाण्यासाठी चांदसैली – तळोदा हाच मार्ग सर्वाधिक सोईस्कर आहे. परंतु या मार्गावर प्रवासाची शाश्वत सुविधाच नसल्यामुळे लाखो नागरिकांना शहादा व अक्कलकुवा मार्गे खर्चिक व वेळखाऊ प्रवास करावा लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी बंद पडलेली व नवीन दोन धडगाव मिनीबस तातडीने सुरु करावी, अशी मागणी पहाडातील लोकप्रतिनिधींनी केली आहे.
           नंदुरबार जिल्ह्याचाच एक भाग असलेल्या धडगाव तालुका व मोलगी परिसरातील लाखो नागरिकांना प्रशासकीय व अन्य कामानिमित्त नंदुरबार या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाण जावेच लागते. नंदुरबार येथे जाण्यासाठी चांदसैली – तळोदा हाच मार्ग सर्वाधिक सोईस्कर ठरतो. परंतु या मार्गावर सुखरुप प्रवासाची शाश्वत सुविधाच नसल्यामुळे लाखो नागरिकांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
       परिवहन महामंडळाच्या मिनीबसची सेवा दोन महिन्यांपासून बंद असल्याने असंख्य नागरिक व विद्यार्थ्यांना अक्कलकुवा अथवा शहादामार्गे खर्चिक शिवाय वेळखाऊ प्रवास करावा लागत आहे. वेळ व पैसा खर्च करूनही नागरिकांची कामे वेळेवर होत नाही. जिल्ह्याच्या मोठ्या जनसमुदायाच्या या समस्या सोडविण्यासाठी महोदयांनी तातडीने नंदुरबार ते धडगाव मिनीबसची सेवा (दोन फेऱ्या) पुर्ववत सुरू करावी. शिवाय मिनीबसच्याच तळोदा ते धडगाव नवीन दोन फेऱ्याही तातडीने सुरु कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना जि.प.सदस्य तथा गटनेते रतन पाडवी, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जि.प.सदस्य सी.के.पाडवी, जि.प.सदस्य विजय पराडके, माजी जि.प.सदस्य सिताराम राऊत, माजी सरपंच केवजी पाडवी आदी उपस्थित होते.
कामांसाठी नंदुरबारला चकरा माराव्या लागतात, परंतु खर्चिक तथा वेळखाऊ प्रवासामुळे नागरीक नंदुरबारला जाणे टाळतात. परिणामी कामे प्रलंबित राहून नागरीकांचा विकास खुंटत आहे. याशिवाय महत्त्वाची कार्यालये (प्रकल्प, प्रांत) व मोठ्या बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या तळोदा येथे या भागातील नागरिक व विद्यार्थ्यांना नेहमीच जावे लागते. येथे जाण्यासाठीही बसची सुविधा नसल्याने नागरिकांना अक्कलकुवा किंवा शहादा मार्गानेच जावे लागते. यात नागरिकांना वेळसह आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 
              -रतन पाडवी,
               जि.प.सदस्य तथा कॉंग्रेस गटनेते 
 दृष्टीक्षेपात अंतर:
धडगाव ते नंदुरबार (शहादा मार्गे) १०० कि.मि.
धडगाव ते नंदुरबार (अक्कलकुवा मार्गे) ९६ कि.मि.
धडगाव ते नंदुरबार (चांदसैली – तळोदा मार्गे) ६५ कि.मि.
———————————-
धडगाव ते तळोदा (शहादा मार्गे) ९३ कि.मि.
धडगाव ते तळोदा (अक्कलकुवा मार्गे) ७९ कि.मि.
धडगाव ते तळोदा (चांदसैली मार्गे) ४३ कि.मि.
बातमी शेअर करा
Previous Post

बालविवाह प्रतिबंधासाठी चाईल्ड हेल्पलाईन वर संपर्क करावा

Next Post

शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची 19 मे रोजी निवड

Next Post
शहादा खरेदी विक्री संघ बिनविरोध, दिपक पाटील गटाची सत्ता कायम

शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची 19 मे रोजी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add