Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्हयात ८०० च्या वर बोगस घरकुल धारकांना दिल्या नोटिसा, जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत माहिती

team by team
May 17, 2023
in राजकीय
0
नंदूरबार जिल्हयात ८०० च्या वर बोगस घरकुल धारकांना दिल्या नोटिसा, जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत माहिती
नंदुरबार  l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात ८०० च्या वर बोगस घरकुल असून त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना सांगितले.
नंदुरबार जि.प.स्थायी समिती सभा याहामोगी सभागृहात जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सभापती गणेश पराडके, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य व जि.प. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.यावेळी सभेत नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे येथील आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी गेलेल्या एका आदिवासी महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांच्या चौकशी समितीने अहवाल सादर केला असून तो आम्हाला अमान्य असल्याचे जि.प.चे सभागृह विरोध पक्षनेते  रतन पाडवी यांनी केला.याप्रकरणी पुन्हा चौकशीची मागणी केली.यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित पुन्हा चौकशी समिती स्थापन करून चौकशी करण्याचे मान्य केले.
दरम्यान जि. प.सदस्य रतन पाडवी , सी.के.पाडवी, विजयसिंह पराडके यांनी सातपुड्यात अनेक गावांमध्ये विहिरी मंजूर झाल्या असून त्या अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याचे सांगत तेथे नुसते खड्डे खोदले असल्याचे सांगत बांधकामासाठी तापीच्या वाळू ऐवजी तेथील नदीची वाळू वापरण्यात येत असल्याचे सांगत.संबधित अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले.यावेळी पाणी पुरवठा अभियंता यांनी
सांगितले की.जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत ८६० पैकी ५८९ कामे सुरू झाली आहेत.सुरवातीला यात ४८३ जणांना नोटिसा देण्यात आल्या.दुसऱ्या वेळेस २७१ कामांना नोटीस देण्यात आल्या तर २७ जणांना दंडाची नोटीस देण्यात आल्याचे सांगितले.
दरम्यान मागील महिन्यात जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात भरती प्रक्रियेत पेसा अंतर्गत भरती झाली नाही.स्थानिक उमेदवारांना डावलून भरती झाल्याचे सांगत सदर भरतीला स्थगिती देण्याची मागणी रतन पाडवी यांनी केली.
दरम्यान यावेळी जिला परिषद सदस्य रतन पाडवी यांनी जिल्ह्यातील बोगस घरकुल बाबत प्रश्न विचारला त्यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले की, जिल्हातील ३० हजार घरांची तपासणी करण्यात आली असून ७९ गावांमधून घरकुल बाबत तक्रार प्राप्त झाली आहे.त्याच चौकशीअंती २७३ घरकुल संशयास्पद आढळले आहेत.
यात पुन्हा चौकशी केली असता २२५ घरकुले खरी आढळली तर ३५० घरकुले संशयास्पद असून सुमारे ८०० च्या वर घरकुले बोगस आढळली असून त्यांना नोटीस देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.दरम्यान बिजगाव येथे तर सरपंच त्याची पत्नी व मुलगा हे घरकुलाचे लाभार्थी असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी विविध विभागांचा आढावा घेण्यात आला.मनरेगा अंतर्गत पुढील महिन्यात सुमारे ६ हजार कामे सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी अधिकाऱ्याने सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

शिवसेनेच्या ( शिंदे गट)सरपंचाच्या पुढाकारातून धमडाई गावात अभिनव उपक्रम

Next Post

“शासन आपल्या दारी” साठी जिल्हास्तरावर जनकल्याण कक्षाची स्थापना :जिल्हाधिकारी मानिषा खत्री

Next Post
‘सलोखा’ योजनेचा लाभ घ्यावा :जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

“शासन आपल्या दारी” साठी जिल्हास्तरावर जनकल्याण कक्षाची स्थापना :जिल्हाधिकारी मानिषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add