Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथील बाजार समितीच्या सभापतीपदी अभिजित पाटील, उपसभापतीपदी डाॅ.सुरेश नाईक यांची बिनविरोध निवड

team by team
May 13, 2023
in राजकीय
0
शहादा येथील बाजार समितीच्या  सभापतीपदी अभिजित पाटील, उपसभापतीपदी डाॅ.सुरेश नाईक यांची बिनविरोध निवड

नंदूरबार l प्रतिनिधी

 

शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अभिजित पाटील तर उपसभापतीपदी डाॅ.सुरेश नाईक यांची बिनविरोध विरोध निवड झाली. बाजार समितीच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी करून आंनदोत्सव साजरा करण्यात आला .

 

माजी सभापती आजोबा फकिरा जयराम पाटील यांच्या ७० वर्षानंतर नातु अभिजित पाटील यांची सभापतीपदी निवड झाली तर ७० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच आदिवासी उपसभापती म्हणून डाॅ.सुरेश नाईक हे विराजमान झाले. या बाजार समितीत पहिल्यांदाच दोन इतिहासाची घटना झाल्याची नोंद झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निरज चौधरी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घनश्याम बागले , हेमंत चौधरी यांनी काम पाहिजे.

 

 

शहादा कृषी बाजार समिती स्थापना १९५० साली झाली होती. पहिले सभापती म्हणून डॉ. विश्राम हरी पाटील यांची निवड झाली होती. या नंतर १९५६ते ५७ दरम्यान विद्यमान नवनिर्वाचित सभापती अभिजित पाटील यांचे आजोबा फकिरा जयराम पाटील हे झाले होते. १९५७ पासून ते आज २०२३ पर्यत स्व.आण्णासाहेब पी के पाटील गटाचे आबादीत वर्चस्व राहिले . या बाजार समितीत परिवर्तन झाले पाहिजे म्हणून माजी जि.प.कृषि सभापती अभिजित पाटील यांनी चांगलीच कंबर कसुन शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून लोकशाही विकास पॅनेचे गट प्रमुख सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील , पालक मंत्री विजयकुमार गावित यांच्या शेतकरी बळीराजा पॅनेलचा पूर्णपणे धुव्वा उडवून एकतर्फी विजय मिळवून १८ पैकी १४ जागा जिंकून आपले वर्चस्व सिध्द करुन ७० वर्षाची सत्ता उलटून टाकली. यामुळे सर्वत्र आंनद साजरा होत आहे.

 

 

नवनिर्वाचित सदस्य सभापती अभिजित पाटील, उपसभापती डाॅ सुरेश नाईक तर संचालक चौधरी दिलीप लिमजी, जगदीश काशिनाथ पाटील, भानुदास भाऊराव पाटील, मयुर दीपक पाटील , विलास काशिनाथ पाटील, शिवाजी मोतीराम पाटील , शिलाबाई दगडू पाटील , हर्षदा अंबालाल बावा , कांतीगीर उमरावगीर पाटील, सत्यानंद प्रकाश गिरासे, मोहनसिंग जयसिंग पाटील , रविंद्र परसू , अहेर शांतीलाल छोटूलाल , जैन मोतीलाल मोहनलाल, जैन रुपेश जसराज , भिल जिवन जससिंग आदी समितीवर निवडून आले.

 

 

 

नवनियुक्त सभापती यांची पत्रकारांशी चर्चा

कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज अभिजीत पाटील यानी आपल्या सभापती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यानी पञकार परिषद घेऊन माहिती दिली
पाच वर्षासाठी सभापती पद तर एक वर्षासाठी उपसभापती पद ठेवण्यात येणार असल्याचे सभापती अभिजीत पाटील यानी सागितले. ही निवड एक मताने करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचा अभ्यास करून शेतकरी यांना कसा फायदा करून देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यानी सागितले. बाजार समिती मध्ये येणारे शेतकरी आल्यानंतर त्याची गैरसोय होणार नाही. शहादा येथे नविन कापसाची मंढी स्थापन करण्यात येईल. तालुक्यात वखार महामंडळ कसे स्थापन करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सागितले. शहरात भाजी मंडई कशी सुरू करता येईल शेतकरी यांच्या गरजा तपासुन निर्णय घेऊ जेणेकरून शेतकरी यांना फायदा होईल. कृषी उत्पन्न बाजार समितीचा कोणकोणते करार केले आहेत. ते तपासले जातील.

बातमी शेअर करा
Previous Post

कर्नाटक येथील विजयाचा नंदुरबार येथे जल्लोष

Next Post

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची आघाडी,शहाद्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

Next Post
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची आघाडी,शहाद्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची आघाडी,शहाद्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add