नंदूरबार l प्रतिनिधी
नुकताच रिलीज झालेला द केरला स्टोरी या मूवी ला चांगली पसंती मिळत आहे. देशातील मुलींवर होणाऱ्या अन्याय अत्याचार आणि धर्मांतरावर या सिनेमाची स्टोरी बनवण्यात आली आहे. यासाठी नंदुरबार शहरातील मावळा प्रतिष्ठान माळीवाडा या सामाजिक संस्थेकडून शहरातील 150 मुलींना द केरला स्टोरी हा सिनेमा फ्री मध्ये दाखवण्यात आला आहे.
या सिनेमात ज्याप्रमाणे स्टोरी दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे मुलींवर होणारे अन्याय अत्याचार कशाप्रकारे होत आहेत. यासाठी नंदुरबार शहरातील मुलींना हा सिनेमा दाखवण्यात आलेला आहे. हिंदु मुलींनी कुठलाही भूलथापांना बळी पडू नये यासाठी हा सिनेमा दाखवण्याच्या उद्दिष्ट या सामाजिक संस्था कडून करण्यात आला होता.नंदुरबार शहरातील अमर सिनेमा गृहात या सिनेमाचं आयोजन करण्यात आलं होते हा सिनेमा पाहण्यासाठी शहरातील मुली मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या.मावळा प्रतिष्ठान माळीवाडा या सामाजीक संस्थे कडून एक हजार च्या वरती हिंदू मुलींना हा सिनेमा दाखवण्याचा मानस केला आहे.