Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

१० वी, १२ वीच्याविद्यार्थी व बेरोजगारांसाठी मोफत समुपदेशन मेळावा

team by team
May 12, 2023
in राज्य
0
१० वी, १२ वीच्याविद्यार्थी व बेरोजगारांसाठी मोफत समुपदेशन मेळावा
नंदुरबार l प्रतिनिधी
  दहावी व बारावी हा उदयोन्मुख युवा पिढीच्या भवितव्याचा  पाया असून त्यासाठी विद्यार्थी व बेरोजगार युवक, पालकांना शासन आपल्या दारी या मोहिमेचा भाग म्हणून मोफत समुपदेशन मेळाव्याचे आज (शनिवार, १३ मे २०२३ )आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्धटन करण्यात येणार आहे.
शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभाग राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांच्यावतीने हा रोजगार मेळावा नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्धटन पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार असून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थी, पालक, बेरोजगार तरूणांना मोफत सहभागी होता येणार आहे.
या विषयांवर मिळणार मोफत मार्गदर्शन
या मेळाव्यात संवाद कौशल्ये, १० वी १२ वी नंतरच्या संधी, कौशल्य विकास विभागाच्या योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व योजना, व्यक्तिमत्व विकास, औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रिया व शिकाऊ कारागिर योजना, शासकीय तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
हे आहेत वक्ते
या मेळाव्यात गिरीश बडगुजर, प्रा. रविकिरण पाटकरी, एस. बी. जाधव, निलेश गायकवाड, गोपाळ महाजन, प्रमोद महाले, रणजित गवांदे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
 विद्यार्थी व बेरोजगारांनी सहभागी व्हावे
दहावी, बारावी हा व्यक्तिमत्व विकासाचा पाया असून बहुतांश मुलांना दहावी, बारावी नंतर काय करावे, याबाबत विविध प्रकारचे प्रश्न असतात. नेमके काय, कसे, कुठे, कशासाठी अशा प्रश्नांचा संभ्रम मनात असतो. तसेच शिक्षण घेतल्यानंतर रोजगाराच्या संधी कोणकोणत्या व कशा कुठे आहेत याबाबतचे मार्गदर्शन वेळीच मिळाले तर बेरोजगारांनाही भविष्याची दिशा निश्चित कराता येते. त्यामुळे या मोफत समुपदेशन मेळाव्याचा लाभ विद्यार्थी व तरूणांनी घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य योगेश पाटील यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नैसर्गिक आपत्ती नियोजनाचा कृती आराखडा प्रत्येक विभागाने करावा : निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे

Next Post

भूसंपादन मोबदल्याची शेतकरी आक्रमक,जिल्हा प्रशासनाने केली थेट शेतकऱ्यांच्या शेतात आखणी

Next Post
भूसंपादन मोबदल्याची शेतकरी आक्रमक,जिल्हा प्रशासनाने केली थेट शेतकऱ्यांच्या शेतात आखणी

भूसंपादन मोबदल्याची शेतकरी आक्रमक,जिल्हा प्रशासनाने केली थेट शेतकऱ्यांच्या शेतात आखणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add