Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अहो आश्चर्यम…नंदुरबार – धुळे बस प्रवास वेळ चक्क सहा तासांचा

team by team
May 12, 2023
in राज्य
0
अहो आश्चर्यम…नंदुरबार – धुळे  बस प्रवास वेळ  चक्क सहा तासांचा
नंदुरबार l प्रतिनिधी
बहुजन हिताय बहुजन सुखाय ब्रीदवाक्य घेऊन सर्व सामान्यांची जीवनवाहिनी ठरलेली एसटी  कधी कधी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरते.  अहो आश्चर्य म्हणजे नंदुरबारहुन धुळ्याला जाण्यासाठी तब्बल सहा तासांचा प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,  शुक्रवार दि. 12 मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास नंदुरबार आगारातून एम. एच. 20 बी. एल. 14 20 क्रमांकाची लालपरी मार्गस्थ झाली.मात्र दीड ते पावणे दोन वाजेच्या सुमारास धावडे गावानजीक सदर बस नादुरुस्त झाली.प्रवाशांनी उतरून बसला धक्का देण्याचा प्रयत्न केला.परंतु कालबाह्य झालेली बस जागेवरून हलण्याचे नाव घेत नव्हती.तब्बल दोन तास प्रवासी उन्हात ताटकळत उभे राहिले.चालक वाहकासह संतप्त आणि त्रस्त प्रवाशांनी नंदुरबार आणि दोंडाईचा आगारात वारंवार संपर्क करून देखील कुणीही प्रतिसाद दिला नाही.
लग्न समारंभांचा हंगाम आणि सुट्ट्या असतांना नंदुरबार आगारातून धुळ्यासाठी वाढती प्रवासी संख्या असून बस उपलब्ध होऊ शकली नाही. यामुळे  नंदुरबार ते धुळे 90 कि.मी.  तब्बल सहा तासांचा प्रवास सहन करीत प्रवाशांना मनस्ताप  झाला. दोन तास उन्हात थांबल्यानंतर नंदुरबार- चाळीसगाव बस आली.त्यातही अर्धवट प्रवाशांना धुळ्यासाठी घेण्यात आले.यामुळेच नंदुरबार ते धुळे असा सहा तासांचा प्रवास घेण्याची वेळ आल्याने प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार
यांच्या बदली नंतर मोरे नामक आगार प्रमुख आले.मात्र त्यांनी देखील दोनच दिवसात पदभार सोडून इतरत्र जाणे पसंत केले.यामुळे नंदुरबार आगारावर कुणाचेही नियंत्रण राहिले नसून वाऱ्यावर सोडल्याचे बोलले जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नंदुरबार आगाराला नवीन बसेस प्राप्त होणार असल्याचे  बोलले जात होते. मात्र याबाबत अद्याप अंमलबजावणी झालेली दिसत नाही.सवलतीच्या तिकीट दरांमुळे दररोज एसटी बसेस मध्ये महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे.प्रवाशांच्या सुविधेसाठी चांगल्या स्थितीतील नवीन बसेस तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी धुळे विभागीय नियंत्रक विजय गीते यांच्याकडे केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

मनवानी येथे शेत मोजणीच्या वादातून सहा जणांना मारहाण ; २२ जणांविरुध्द गुन्हा दाखल

Next Post

नैसर्गिक आपत्ती नियोजनाचा कृती आराखडा प्रत्येक विभागाने करावा : निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे

Next Post
नैसर्गिक आपत्ती नियोजनाचा कृती आराखडा प्रत्येक विभागाने करावा : निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे

नैसर्गिक आपत्ती नियोजनाचा कृती आराखडा प्रत्येक विभागाने करावा : निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add