Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी उद्योजकांना प्रक्रिया उद्योगांसाठी आर्थिक पाठबळ देणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

team by team
May 12, 2023
in राजकीय
0
आदिवासी उद्योजकांना प्रक्रिया उद्योगांसाठी आर्थिक पाठबळ देणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नाशिक  l

 जिल्ह्यातील आदिवासी भागात वनसंपत्ती विपुल प्रमाणात आहेत. उपलब्ध वनसंपत्तीचा वापर करून प्रक्रिया उद्योगासाठी अनेक महिला बचतगट, उद्योग संस्था पुढे येत आहेत. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत या प्रक्रिया उद्योगांसाठी आदिवासी उद्योजकांना आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या रावसाहेब थोरात सभागृह येथे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजनांचा सामंजस्य करार सोहळा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक बाबासाहेब शिंदे, व्यवस्थापक (लेखा) मनोजकुमार शर्मा, संचालक विकास वळवी यांच्यासह विविध संस्था व बचतगटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आदिवासी विकास मंत्री डॉ.गावित म्हणाले, आदिवासी बांधवांना उद्योजकतेच्या प्रशिक्षणातून व्यवसाय उपलब्ध करून त्यांना आर्थिक सक्षम कसे करता येईल यादृष्टीने शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ कार्यरत आहे. त्यानुसार बचतगट, वनधन केंद्र, ग्रामीण समूह, फळ प्रक्रिया उद्योजक, राईस मिल, वनऔषधी उद्योजक, गृहोद्योग यांना आवश्यक वित्त पुरवठा करण्यात शबरी महामंडळ अग्रेसर आहे. येणाऱ्या काळात आदिवासी बांधवांनी प्रक्रिया उद्योगातून तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी सांगितले.

मंत्री डॉ. विजयकुमार गावित पुढे म्हणाले, ज्या भागात जे वनउपज उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग आदिवासी बांधवांनी आपल्या उद्योगासाठी केला पाहिजे. उद्योगासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. आदिवासी विकास विभागामार्फत अनेक योजना राबविल्या जात असून आदिवासी महिला उद्योजक सुद्धा पुढे येत आहेत. परिश्रम व सहभागातून आगामी काळात आदिवासी बांधव नक्कीच यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला येतील यात शंका नाही, असा विश्वास मंत्री डॉ. गावित यांनी व्यक्त केला.

यावेळी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, एन. डी. गावित, रायासिंग वळवी, रमेश सवरा, चैराम पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ अंतर्गत 10 स्वयंसहाय्यता बचत गटांना रूपये पाच लाख कर्ज मंजुरी आदेशांचे वितरण आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

अ.क्र बचत गटाचे नाव पत्ता व्यवसायाचे नाव कर्ज मंजुर रक्कम
1 जयभोले स्वयंसहायता बचत गट पोस्ट आड ता. पेठ जि. नाशिक कुक्कुटपालन 5,00,000
2 जिवदानी महिला स्वयंसहायता बचत गट पोस्ट चोलमुख ता. पेठ जि. नाशिक विट भट्टी 5,00,000
3 जय जनार्दन स्वंयसहायता बचत गट पोस्ट खिरकडे ता.पेठ जि.नाशिक विट भट्टी 5,00,000
4 नम्रता स्वयंसहायता बचत गट पोस्ट खिरकडे ता.पेठ जि.नाशिक कुक्कुटपालन 5,00,000
5 कल्याणी स्वयंसहायता बचत गट पोस्ट अंजनेरी ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक शेळीपालन 5,00,000
6 दुर्गा स्वयंसहायता बजत गट पोस्ट खिरकडे ता.पेठ जि.नाशिक कुक्कुटपालन 5,00,000
7 संजिवानी महिला समुह बचत गट तिर्डे, पोस्ट कोपर्ली (दु) ता. पेठ, जि. नाशिक कुक्कुटपालन 5,00,000
8 जीवन महिला बचत गट पोस्ट कोहेर ता. पेठ जि. नाशिक विट भट्टी 5,00,000
9 राणी लक्ष्मीबाई महिला बचत गट चिंचवोहळ ता. त्र्यंबकेश्वर, जि. ना‍शिक हॉटेल ढाबा 5,00,000
10 पूर्वा समूह बचत गट पोस्ट कोहेर ता. पेठ जि. नाशिक कुक्कुटपालन 5,00,000
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात १ हजार ७२४ हेक्टरवर फळबाग लागवड – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी करणार : डॉ. विजयकुमार गावित

Next Post
आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी करणार : डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी करणार : डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add