Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आरोग्य,शिक्षण आणि कृषी विषयांवर नंदुरबार येथे शैक्षणिक परिषद उत्साहात

team by team
May 12, 2023
in राज्य
0
आरोग्य,शिक्षण आणि कृषी विषयांवर नंदुरबार येथे शैक्षणिक परिषद उत्साहात
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस व लीडरशिप फॉर इक्विटी या स्वयंसेवी संस्थांच्यावतीने नंदुरबार येथे एक दिवशीय आरोग्य,शिक्षण आणि कृषी या क्षेत्रात नंदुरबार जिल्ह्याने केलेले पथदर्शक प्रकल्प या विषयांवर शैक्षणिक परिषद संपन्न झाली.
 या परिषदेस नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (दूरदृष्य प्रणाली), जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (दूरदृष्य प्रणाली), जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया (दूरदृष्य प्रणाली), सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मंदार पत्की यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
परिषदेत नंदुरबार जिल्ह्यात अलीकडच्या काळात आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात राबविल्या गेलेल्या नाविण्यपूर्ण यशस्वी प्रकल्पांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमात आरोग्य, शिक्षण आणि कृषी या विषयावर परिसंवाद पार पडले. यात नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी   आशिमा मित्तल यांनी आरोग्यासंबंधी, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी शिक्षणसंबंधी तर कृषी विषयाशी संबंधित परिसंवादामध्ये वनमती, नागपूर प्रकल्पाच्या संचालक मिताली सेठी यांनी तर महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम)  व्यवस्थापकीय संचालक इंदू जाखर यांनी सहभाग घेतला.
वरील तीनही क्षेत्रात उल्लेखनीय प्रकल्प राबवणाऱ्या अधिकारी, शेतकरी, शिक्षक, अंगणवाडी सेविकांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवराच्या हस्ते सन्मान करण्यात आला. परिषदेत प्रशासकीय प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, धोरणे ठरवणारे, अंमलबजावणी करणारे, तज्ञ मंडळी  तसेच सर्व भागधारक एकत्र येवून त्यांच्या वैचारिक देवाण घेवाणीतून आणि यशस्वी प्रकल्पांच्या माध्यमातून, आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात जिल्ह्यांच्या पुढील वाटचालीकरीता दिशा व धोरणे ठरविण्यावर चर्चा करण्यात आली.
प्रारंभी  जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दूरदृष्य प्रणालीवरुन मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री तसेच  नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यांचा झाला गौरव
महिला व बाल कल्याण
 सारीका दादर,अंगणवाडी पर्यवेक्षक
 बबीता पाडवी, अंणवाडी सेविका
 कृषी
रोशन बोरसे
योगेश पाटील
दिलीप पाडवी
धनराज पाडवी
 शिक्षण क्षेत्रात
 अनिता पाटील
निर्मल माळी
रुपाली गोसावी
राजेश भावसार
आरोग्य क्षेत्रात
 डॉ.रोशनी पाटील
 डॉ.हितेश सुगंधी
मनीषा पाडवी, परीचालिका
उषा ठाकरे,आशा नर्स
 कृष्णा पावरा
बातमी शेअर करा
Previous Post

बालविवाह व अंमली पदार्थ विरुध्द राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन नंबर जाहीर

Next Post

यंदाच्या उन्हाळी हंगामातील सर्वोच्च 44.7 अंश तापमानाची नोंद

Next Post
अरे बापरे : जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता

यंदाच्या उन्हाळी हंगामातील सर्वोच्च 44.7 अंश तापमानाची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add