Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना चिमुकल्यांनी दिला अनोखा निरोप

team by team
May 11, 2023
in शैक्षणिक
0
शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना चिमुकल्यांनी दिला अनोखा निरोप
नंदुरबार l प्रतिनिधी
शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना चिमुकल्या विद्यार्थिनींसह माजी विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने निरोप दिला. विद्यार्थिनींसह पालकांनी कार्यक्रमाचे आयोजन करीत रनाळे जिल्हा परिषद कन्या शाळेत हा कार्यक्रम घडवून आणला.
 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या झाल्या आहेत. शिक्षकांना १५ मे पर्यंत नवीन शाळेत रुजू होण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत. नंदुरबार तालुक्यातील रनाळे जिल्हा परिषद कन्या शाळेतील मुख्याध्यापक अमृत पाटील व शिक्षिका उज्ज्वला पाटील यांचीदेखील दुसऱ्या शाळेवर बदली झाली आहे. त्यांनी येथील पदभार सोडण्यापूर्वीच शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या शकुंतला सुरेश शिंत्रे, सरपंच नलिनी ओगले, जितू ओगले, सुरेश शिंत्रे, गोकुळ नागरे, शरद तांबोळी, सुरेश भगुरे, लक्ष्मण नागरे, माधवराव नागरे आदी उपस्थित होते. चिमुकल्या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करीत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आपल्या भावनांना वाट करून दिली. माजी विद्यार्थिनींनीही यावेळी हजेरी लावली. स्वत:च फुलांचे गुच्छ तयार करून ते आपल्या प्रिय शिक्षकांना दिले. याच शाळेत काम करीत असताना या दोन्ही शिक्षकांना राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कारदेखील मिळाला आहे. शिवाय जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा करण्याचा मानदेखील याच शिक्षकांच्या सानिध्यात शाळेला मिळाला होता. अमृत पाटील व उज्ज्वला पाटील यांनीदेखील शाळा व गावाप्रती मनोगत व्यक्त करीत १२ वर्षांत शाळेचा कायापालट करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राकेश घुगे, पंचायत समिती सदस्य भेगाबाई भिल, राकेश चौधरी, मिलिंद पवार, पंडित नागरे, रवींद्र भाबळ आदींसह अंगणवाडी सेविका, बचत गट सदस्या उपस्थित होत्या. संयोजन मंगेश वसावे, सूत्रसंचालन हेमराज भाबळ तर आभार दीपक पाटील यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा खरेदी विक्री संघ बिनविरोध, दिपक पाटील गटाची सत्ता कायम

Next Post

शनिमांडळ येथे शनि मंदिराचा कलशरोहन व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन

Next Post
शनिमांडळ येथे शनि मंदिराचा कलशरोहन व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन

शनिमांडळ येथे शनि मंदिराचा कलशरोहन व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

September 29, 2026
दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

September 29, 2026
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

September 28, 2026
सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी  निवड

सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी निवड

September 28, 2026
ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

September 28, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

September 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add