Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकाशा येथे ट्रक व पीकअपचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी

team by team
May 8, 2023
in क्राईम
0
प्रकाशा येथे ट्रक व पीकअपचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी

नंदूरबार l प्रतिनिधी

प्रकाशा ता. शहादा येथे कोकणमाता मंदिर जवळ ट्रक व पीकअप यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघातात तीन जण जागीच ठार व दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाता नंतर घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीकअप (क्र.एम.पी.०९, एच.एच.५५११) मध्यप्रदेशातून गुजरात राज्यात लग्न समारंभासाठी लागणारे साहित्य तसेच धान्य घेऊन जात असतांना प्रकाशा गावाजवळ दि.७ मे रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ट्रक (क्र. जी.जे.५ बी.एक्स.४४८३) ने जोरदार धडक दिली.त्यात पीकअप मध्ये चालकासह एकूण पाच जण होते.त्यापैकी तीन जण जागीच ठार झालेत तर अन्य दोन जन गंभीररित्या जखमी झाले आहेत.

 

 

अपघात एवढा मोठा भीषण होता की कानठळ्या बसवणारा आवाज झाला होता.त्यात पीकअप पूर्णतः चक्काचूर झाली. प्रकाशा पोलिसांनी तातडीने अपघात स्थळी जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली.जेसीबी यंत्राच्या साह्याने ट्रकमध्ये अडकलेल्या पीकअप बाहेर काढले.अपघात स्थळी रक्ताच्या सडा पडलेला होता.पीकअप मधील सर्व साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले होते.जखमींना मदत करण्यासाठी प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे संदीप खंदारे व रामा वळवी तसेच जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील सुरेश पाटील स्थानिक पत्रकार सह ग्रामस्थांनी मदत केली व रस्त्यावरची वाहतूक सुरळीत सुरू केली.अपघातानंतर ट्रक चालक व क्लीनर दोघेही फरार झालेले आहेत.

 

अपघातात हेमराज अंजने (वय ३९) रा. सुरत मनोज घाट्या (वय ४२) रा. सुरत,भगवानभाई गोविंद पंचुले (वय ४८) रा. गोंदिया मध्यप्रदेश हे तिन्ही जण जागीच ठार झाले.शहादा ग्रामीण रुग्णालयात डॉ.गोविंद शेल्टे, डॉ. लक्ष्मीकांत साठे, डॉ. सत्यानंद पाटील यांनी शवविच्छेदन करून प्रेते नातेवाईकांच्या ताब्यात दिली.अपघातात पीकअप चालक गोलूभाई रा. हिरापूर,अनिकेत अंतिम रा. हिरापूर ( मध्यप्रदेश) या गंभीर जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलेले आहेत.

 

 

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी भेट दिली.शहादा पोलिसात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.पुढील तपास प्रकाशा पोलीस दुरक्षेत्राचे संदीप खंदारे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

खांमगाव शिवारात तिहेरी अपघातात एक ठार, एक जखमी

Next Post

अवकाळी आणि कमी पावसाच्या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य मार्गदर्शन करा : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post
अवकाळी आणि कमी पावसाच्या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य मार्गदर्शन करा : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

अवकाळी आणि कमी पावसाच्या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य मार्गदर्शन करा : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add