Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार पोलीसांनी रोखले तब्बल तीन बालविवाह

team by team
May 6, 2023
in क्राईम
0
शेल्टापाणी येथे दोन गटात वाद,  तिघे जखमी ; परस्पर फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार पोलिसांनी नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे दोन व अक्कलकुवा तालुक्यातील बेटी गावातील एका अल्पवयीन असे तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले आहेत.याप्रकरणी अल्पवयीन मुलींच्या पालकांना पोलीस प्रशासनाने नोटिशी दिल्या आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 4 मे 2023 रोजी विसरवाडी व अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना स्थानिक नागरिकांकडून गुप्त माहिती मिळाली की, विसरवाडी गावात दोन व अक्कलकुवा तालुक्यातील बेटी गावातील एका अल्पवयीन मुलींच्या विवाहाचे त्यांचे कुटुंबिय नियोजन करीत असल्याची माहिती मिळाली. सदर घटनेची माहिती विसरवाडी व अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना कळविल्याने त्यांनी सदरचे बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलींच्या पालकांचे समुपदेशन करण्याबाबत आदेशीत केले.

 

त्याप्रमाणे विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलचे सदस्यांनी तात्काळ माहिती काढली असता, विसरवाडी गावातील एका अल्पवयीन मुलींचा विवाह साक्री व एका अल्पवयीन मुलीचा विवाह नंदुरबार येथील तरुणांसोबत निश्चित करण्यात आला होता, परंतु विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तेथे दोन्ही अल्पवयीन मुलींच्या घरी जावून अल्पवयीन मुलींच्या कुटुंबीयांचे व त्यांच्या समाजाचे समुपदेशन करुन त्यांचे मनपरिवर्तन केले.

 

 

तसेच दोन्ही अल्पवयीन मुलीच्या पालकांना विसरवाडी पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. दोन्ही अल्पवयीन मुलींच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.

 

 

तसेच 4 मे रोजी अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील बेटी या गावात पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गावीत यांनी जावून माहिती घेतली असता बेटी गावातील अल्पवयीन मुलीचा होराफळी गावातील तरुणासोबत विवाह निश्चित करण्यात आला होता. अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गावीत यांनी अल्पवयीन मुलीचे आई, वडील व तेथे हजर असलेल्या नातेवाईकांना तसेच हजर असलेले गावकरी यांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन मनपरिवर्तन केले.

 

 

तसेच अल्पवयीन मुलीच्या पालकांना अक्कलकुवा पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.

 

 

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षता अंतर्गत नंदुरबार पोलीसांनी तीन दिवसात पाचवा बालविवाह रोखल्याने नंदुरबार पोलीसांचे सर्वत्र कौतूक होत आहे. तसेच ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाहाच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यात यश येईल तसेच आज पावेतो नंदुरबार जिल्ह्यातील 634 ग्रामपंचायतींपैकी 615 ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह विरोधी ठराव घेण्यात आले आहेत. तसेच उर्वरीत ग्रामपंचायतींचे ठराव देखील लवकरच घेण्यात येतील, असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

 

 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश गावीत, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन पाटील, बेटी गावाचे पोलीस पाटील सुरेश वसावे, होराफळीचे पोलीस पाटील दारासिंग वळवी यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व आश्रमशाळांच्या वसतिगृहांचे बांधकाम पूर्ण करणार- आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post

मध्यान्ह भोजन योजनेची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात करणार : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post
मध्यान्ह भोजन योजनेची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात करणार : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

मध्यान्ह भोजन योजनेची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात करणार : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add