Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार पोलीसांनी अवघ्या दोनच दिवसात रोखला दुसरा बालविवाह

team by team
May 4, 2023
in क्राईम
0
शेल्टापाणी येथे दोन गटात वाद,  तिघे जखमी ; परस्पर फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा

नंदूरबार l प्रतिनिधी

सोरापाडा ता.अक्कलकुवा येथे अल्पवयीन मुलगा व मुलगीचा बालविवाह रोखण्यात आकलकुवा अक्षता सेलला यश आले असून ऑपरेशन अक्षता अंतर्गत नंदुरबार पोलीसांनी दोनच दिवसात दुसरा बालविवाह रोखला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 3 मे रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना माहिती मिळाली की, अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील एका अल्पवयीन मुलीचा त्याच गावातील एका मुलासोबत आदिवासी रितीरिवाजाप्रमाणे दि.3 मे रोजी बालविवाह होणार आहे.

याबाबत पोलीस अधीक्षकांनी सदर घटनेची माहिती अक्क्लकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजेश गावीत यांना कळवून सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करणेबाबत आदेशीत केले.

 

 

अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश गावीत व पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलचे सदस्यांनी तात्काळ अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे जावून तेथे बालविवाह होणाऱ्या अल्पवयीन मुलीची माहिती काढली असता एका ठिकाणी मुलगी व मुलाच्या नातेवाईकांची आपसात बैठक करुन जाती रिवाजाप्रमाणे विवाहाची बोलणी सुरु होती व ३ मे रोजीच रात्री रितीरिवाजाप्रमाणे विवाह करणार असल्याचे समजून आले. म्हणून अक्षता सेलच्या सदस्यांनी तेथे हजर असलेल्या मुलाच्या व मुलीच्या नातेवाईकांना त्यांच्या जन्म तारखेबाबत विचारपूस करुन आधार कार्डची मागणी केली.

 

 

आधार कार्डची पाहणी केल्यानंतर सदरची मुलगी 15 वर्षे व मुलाचे वय 18 वर्षे 10 महिने वयाचे दोन्हीही अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस ठाणे स्तरावर सुरु करण्यात आलेल्या अक्षता समितीने अल्पवयीन मुलाचे व मुलीचे आई, वडील व तेथे हजर असलेल्या नातेवाईकांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलगा व मुलगी यांना होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन त्यांचे मनपरिवर्तन केले.

 

 

 

तसेच अल्पवयीन मुलगी व मुलाच्या पालकांना अक्कलकुवा पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलाच्या व मुलीच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षता अंतर्गत नंदुरबार पोलीसांनी दोनच दिवसात दुसरा बालविवाह रोखल्याने नंदुरबार पोलीसांचे सर्वत्र कौतूक होत आहे. तसेच ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल.

 

 

त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाहाच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यात यश येईल तसेच आज पावेतो नंदुरबार जिल्ह्यातील 634 ग्रामपंचायतींपैकी 615 ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह विरोधी ठराव घेण्यात आले आहेत. तसेच उर्वरीत ग्रामपंचायतींचे ठराव देखील लवकरच घेण्यात येतील, असे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.

 

 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश गावीत पोलीस उप निरीक्षक रितेश राऊत, पोलीस उप निरीक्षक अंकिता बावीस्कर, पोलीस नाईक सुनिल पवार, पोलीस अंमलदार पंकज जिरेमाळी यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पत्नीच्या मृत्यूप्रकरणी आरोपीतांवर कारवाईसाठी पतीची लहान मुलांसह आमरण उपोषण

Next Post

नंदुरबार,शहादा शहरांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत खर्च करावा : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post
नंदुरबार,शहादा शहरांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत खर्च करावा : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार,शहादा शहरांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत खर्च करावा : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add