नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस कमेटीतर्फे कॉंग्रेस कार्यालयावर ध्वजवंदन करण्यात आले. ध्वजवंदन महिला सन्मान म्हणून टि.आर.खान यांच्या हस्ते करण्यात आले.
१ मे जागतिक कामगार दिन असल्याने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांबद्दल केलेले कायदेप्रणाली मुळे आज कामगारांना संरक्षण असल्याने,त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
त्या प्रसंगी जिल्हा कॉंग्रेसचे राजेंद्र पाटील,स्वयंरोजगार सेलचे रऊफ शहा,सेवादलाचे भास्करराव सोनवणे.पंडीतराव तडवी ,आप्पा वाघ,खंडेराव पवार,बेघर संघर्ष समितीचे दिलावर शाह, दत्तू पवार,सलाम भाया यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.