नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर शहरालगत स्टेशन रोड नजीक ट्रक व जीपचा अपघात झाला. ट्रकने कारला एका बाजूला जोरदार धडक दिल्याने कार मधील दोन एअर बॅग उघडल्याने चारही जणांचे वाचले प्राण. यात चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. खाजगी वाहनाने जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर शहरालगत असलेल्या स्टेशन रोडच्या वळणावर एक वाजेच्या सुमारास ट्रक व जीप चा अपघात होऊन चार जण जखमी झालेले आहेत आपल्या पतीची पेन्शन घेण्यासाठी जावईसह जात असताना अपघात झाला आहे. यात चौघांना हाता पायाला व छातीला दुखापत झाली आहे. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. अपघातग्रस्तांना स्टेशन रोडवरील नागरिकांनी तात्काळ मदत करीत रुग्णालयात रवाना केले. या अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात गुलि गबजी मावची ( वय 82 , इंदू विजय पवार ( वय56) ,विजय सुकर पवार (वय 58), रतिलाल सोनू काकडे (वय 60) सर्व रा. गुजरात राज्यातील सुबिर जिल्हा डांग येथील आहे. रतिलाल काकडे हे उच्छल पोलीस ठाण्यातील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक कार चालवत होते. सीट बेल्ट लावून कार चालवत असल्याने अपघात होतात गाडी मधील एअर बॅग उघडल्याने सर्वांचे प्राण वाचले प्रवास करताना वाहतुकीचे नियम पाळल्यानंतर अपघात जरी झाला तरी प्राण वाचण्याची शक्यता असते याचे उत्तम उदाहरण या अपघातातून दिसून आले.