नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील धुळे-सुरत महामार्गावर सावरट गावाजवळील उड्डाणपुलावर दुचाकी व चारचाकी वाहनाचा भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याच्या उपचारासाठी व्यारा येथे घेऊन जात असताना सोनगड दरम्यान रस्त्यातच प्राणजोत मावळली आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ व युवराज परदेशी यांनी पाहणी केली
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवापुर तालुक्यातील नवापाडा येथील वडील व त्यांचे मित्र मुलीकडे मोटरसायकलीने जात असताना काल दि.२ मे रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना धुळ्याहून गुजरातकडे जाणारी कार (क्र.जी.जे.01, आर.वाय. 0875) धडक दिली. मोटरसायकल (क्र.जी.जे.5, के.एल.1999)अचानक समोर आल्याने कार चालकाने जोरदार ब्रेक मारला.परंतू दुर्दैवाने भीषण अपघात झाला अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.एक जण गंभीर जखमी झाला. उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तापी येथे रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.अपघातग्रस्तांना जीवनधारा खाजगी रूग्णवाहिकेतून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातात नंदऱ्या होमा गावित (वय 60) रा.नवापाडा यांचा जागीच मृत्यू झाला तर वेच्या महाऱ्या गावित (वय 58) रा.नवापाडा ता. नवापूर यांच्या पायाचे तुकडे झाले असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी घेऊन जाताना रस्त्यातच मृत्यू झाल्याने या अपघातात दोन जण ठार झाले आहे.
नवापाडा येथून सकाळी साडे सातला नंद-या होमा गावित मुलीला भेटण्यासाठी बिलगव्हाण येत जात असताना अपघात झाला.मुलीला अपघाताची माहिती मिळताच नवापूर रूग्णालयात आक्रोश केला.